डोनाल्ड ट्रम्प यांच्या ‘त्या’ एक सहीमुळे भारताची धाकधूक वाढली! देशभरात खळबळ

On: February 12, 2026 5:20 PM
Donald Trump
---Advertisement---

Donald Trump | अमेरिका (United States) आणि भारत (India) यांच्यातील व्यापार संबंधांमध्ये सकारात्मक घडामोडी सुरू असतानाच आता एक चिंताजनक बातमी समोर आली आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांनी घेतलेल्या संभाव्य निर्णयामुळे भारतातील लाखो तरुणांच्या करिअरवर मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे. विशेषतः अमेरिकेत नोकरीच्या संधी शोधणाऱ्यांसाठी ही बातमी धक्कादायक ठरत आहे.

टॅरिफ कमी, पण दुसरीकडे चिंता वाढली :

अमेरिका आणि भारतामध्ये नुकतीच एक महत्त्वाची ट्रेड डील अंतिम टप्प्यात आली आहे. या कराराअंतर्गत अमेरिकेने भारतावर लागू असलेले टॅरिफ 50 टक्क्यांवरून थेट 18 टक्क्यांपर्यंत कमी केले आहेत. आशियातील इतर देशांच्या तुलनेत भारतावर सध्या सर्वात कमी आयात शुल्क आकारले जात असल्याने भारतीय उद्योगांसाठी हा मोठा दिलासा मानला जात होता.

मात्र या निर्णयामुळे मिळालेला आनंद फार काळ टिकण्याची शक्यता नाही. कारण याच दरम्यान अमेरिकेकडून आणखी एक कठोर पाऊल उचलण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. यामुळे व्यापाराच्या आघाडीवर दिलासा मिळाला असला तरी रोजगाराच्या बाबतीत भारतासाठी चिंता निर्माण झाली आहे. अमेरिकेत काम करण्याची संधी शोधणाऱ्या लाखो भारतीयांसाठी ही परिस्थिती अस्वस्थ करणारी ठरत आहे.

Donald Trump | H-1B व्हिसा योजना बंद होण्याची शक्यता :

डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांच्या कार्यकाळापासूनच H-1B व्हिसा कार्यक्रम त्यांच्या निशाण्यावर राहिला आहे. काही दिवसांपूर्वीच या व्हिसाच्या शुल्कामध्ये मोठी वाढ करण्यात आली होती. आता मात्र हा कार्यक्रम पूर्णपणे बंद करण्याच्या हालचाली सुरू झाल्याची माहिती समोर आली आहे. अमेरिकेच्या संसदेत या योजनेला संपुष्टात आणण्यासाठी विधेयक सादर करण्यात आले असून, यामुळे परिस्थिती अधिक गंभीर बनली आहे.

फ्लोरिडा (Florida) येथील रिपब्लिकन पक्षाचे खासदार ग्रेड स्ट्यूब (Greg Steube) यांनी हे विधेयक संसदेत मांडले आहे. सध्या सुरू असलेल्या हालचाली पाहता हे विधेयक मंजूर होऊन कायद्यात रूपांतर होण्याची शक्यता नाकारता येत नाही. तसे झाल्यास जगभरातील H-1B व्हिसा धारकांपैकी सुमारे 70 टक्के भारतीय असल्याने याचा सर्वात मोठा फटका भारतालाच बसणार आहे. त्यामुळे अमेरिकेत नोकरी करण्याचे स्वप्न पाहणाऱ्या अनेक तरुणांच्या आशा धूसर होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

News Title: Trump’s Visa Move Shocks Indian Workforce

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now