नॅशनल क्रश Tripti Dimri अडकणार लग्नबंधनात?; म्हणाली ‘माझा नवरा’…

On: February 1, 2024 5:38 PM
tripti dimri
---Advertisement---

Tripti Dimri | अभिनेता रणबीर कपूर आणि अभिनेत्री रश्मिका मंदाना यांचा ॲनिमल या चित्रपटाची चांगलीच चर्चा रंगली होती. बाॅक्स ऑफिसवर ॲनिमल या चित्रपटाला प्रेक्षकांचा भरपूर प्रतिसाद मिळाला. मात्र, या चित्रपटात रणबीर आणि रश्मिका या दोघांपेक्षा जास्तीत जास्त चर्चा झाली ती अभिनेत्री तृप्ती डिमरीची (Tripti Dimri).

‘ॲनिमल’ सिनेमा प्रदर्शित झाल्यानंतर एका रात्रीत तृप्ती हिला नॅशनल क्रश म्हणून ओळख मिळाली. या चित्रपटात तृप्तीने इंटिमेट सीन दिल्यामुळे एका रात्रीतूनच तृप्ती नॅशनल क्रश म्हणून ओळखली जाऊ लागली. दरम्यान सध्या चर्चा आहे ती तृप्तीच्या लग्नाची.

तृप्ती करणार लग्न?

सोशल मीडियावर तुप्ती (Tripti Dimri) आपल्या चाहत्यांसाठी कायम सक्रिय असते. चाहत्यांसाठी ती रोज नवनवीन फोटो शेअर करत असते. काही दिवसांपूर्वी तृप्तीने तिच्या बाॅयफ्रेंडला वाढदिवसाच्या शुभेच्छा देत फोटो शेअर केला होता. दरम्यान तृप्ती लग्न कधी करणार असा प्रश्न तिच्या चाहत्यांना पडला आहे. एका मुलाखतीमध्ये बोलत असताना तृप्तीने याचा खुलासा केला आहे.

तृप्ती म्हणाली ‘लग्नाविषयी मी अजून काही विचार केलेला नाही. ‘तर त्यानंतर होणाऱ्या नवऱ्याविषयी बोलताना तृप्ती म्हणाली ‘मी जास्त काही विचार केला नाही. मात्र माझी इच्छा आहे की माझा नवरा व्यक्ती म्हणून चांगला असायला हवा.’

तुप्ती आणि कर्नेषच्या नात्याची चर्चा

तृप्ती आणि कर्नेष या दोघांच्या नात्याची चर्चा सुरु होती. बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्माच्या भावासोबत तृप्तीचं नाव जोडण्यात आलं होतं. मात्र, काही वर्ष एकमेकांना डेट केल्यानंतर त्या दोघांनी विभक्त होण्याचा निर्णय घेत ब्रेकअप केला. तृप्ती डिमरी कर्नेश शर्माच्या (Karnesh Sharma) प्रोडक्शनने बनवलेल्या बुलबुल (Bulbbul) या सिनेमात सर्वात आधी दिसली होती. नंतर त्यांच्याच प्रोडक्शनने बनवलेल्या कला (Qala) सिनेमातही ती प्रमुख भूमिकेत दिसली होती.

या दरम्यान अनेक पार्ट्यांमध्ये दोघं एकत्र दिसले होते, त्यांचे रोमँटिक अंदाजातले काही फोटो सुद्धा सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. मात्र, त्यांच्या ब्रेकअपनंतर अशी चर्चा रंगू लागली होती की तृप्ती आता बिझनेसमॅन सॅम मर्चेंटला डेट करत आहे.

News Title : tripti dimri to make a plan for her wedding

महत्त्वाच्या बातम्या-

Jackie Shroff | माधुरी दीक्षितसोबतच्या इंटिमेट सीनबद्दल जॅकी श्रॉफ यांचा मोठा खुलासा; म्हणाले..

Ramayana | रणबीर कपूर बनणार ‘राम’ तर सीतेच्या भुमिकेत दिसणार ‘ही’ प्रसिद्ध अभिनेत्री

Manoj Jarange | ‘तुरूंगात जाण्याची भिती…’; मनोज जरांगेंचा गंभीर आरोप

Manoj Jarange | जरांगे पाटलांची थेट अर्थमंत्र्यांकडेच मोठी मागणी!

Gold Silver Rate | ग्राहकांना मोठा धक्का! सोन महागलं, जाणून घ्या दर

Mrudula Jog

Mrudula Jog

Join WhatsApp Group

Join Now