Tripti Dimriचं अनुष्काच्या भावासोबत ब्रेकअप, ‘या’ बलाढ्य व्यक्तीसोबत सुरु झालंय अफेअर?

On: December 17, 2023 8:35 PM
tripti dimri
---Advertisement---

Tripti Dimri | रणबीर कपूरच्या Animal सिनेमाची सध्या जेवढी चर्चा आहे तेवढीच किंबहुना त्यापेक्षा जास्त चर्चा या सिनेमातील एक पात्र असलेल्या झोयाची अर्थात तृप्ती डिमरी या अभिनेत्रीची आहे. सिनेमातील आपल्या अभिनयामुळे तिला एवढी प्रसिद्धी मिळाली की तृप्ती रातोरात नॅशनल क्रश म्हणून ओळखली जाऊ लागली. आता तृप्तीच्या अफेअर्सच्या चर्चांना जोरदार उधाण आलं आहे.

तृप्ती डिमरी जेव्हा प्रसिद्धीच्या झोतात आली तेव्हा तिचं नाव अनुष्का शर्माचा भाऊ कर्नेश शर्मासोबत जोडलं जाऊ लागलं होतं. दोघं एकमेकांना डेट करत असल्याची जोरदार चर्चा होती. अनुष्काच्या भावाचे आणि तीचे फोटो सुद्धा यावेळी व्हायरल झाले होते, मात्र ती (Tripti Dimri) आता अनुष्काच्या भावाच्या प्रेमात नसून दुसऱ्याच कुणाच्या प्रेमात असल्याची चर्चा सुरु झाली आहे.

अनुष्काच्या भावासोबत ब्रेकअप?-

तृप्ती डिमरी कर्नेश शर्माच्या (Karnesh Sharma) प्रोडक्शनने बनवलेल्या बुलबुल (Bulbbul) या सिनेमात सर्वात आधी दिसली होती, नंतर त्यांच्याच प्रोडक्शनने बनवलेल्या कला (Qala) सिनेमातही ती प्रमुख भूमिकेत दिसली होती. या दरम्यान अनेक पार्ट्यांमध्ये दोघं एकत्र दिसले होते, त्यांचे रोमँटिक अंदाजातले काही फोटो सुद्धा सोशल मीडियावर व्हायरल झाले होते.

तृप्ती डिमरी आणि कर्नेश शर्मा एकमेकांच्या प्रेमात असल्याच्या त्यावेळी चर्चा होत्या, मात्र त्या चर्चांना हवी तेवढी प्रसिद्धी मिळाली नव्हती कारण तृप्ती (Tripti Dimri ) त्यावेळी फार मोठी स्टार झालेली नव्हती. मात्र कला सिनेमानंतर दोघांच्या नात्यात दुरावा आल्याची माहिती आहे, तसेच दोघांचं ब्रेकअप सुद्धा झाल्याचं कळतंय. त्यामुळे आता तृप्ती कर्नेशला डेट करत नसल्याची माहिती आहे.

कर्नेश नाही मग कुणाला करतेय डेट?-

तृप्ती आणि कर्नेश यांनी आपल्या नात्याची कबुली दिली नव्हती. मात्र काही दिवसांपूर्वी त्यांच्या ब्रेकअपच्या काही बातम्या आल्या होत्या. आता तृप्तीचं नाव एका नव्याच माणसासोबत जोडलं जात आहे. सैम मर्चेंट (Sam Merchant) असं या व्यक्तीचं नाव असून ते बलाढ्य उद्योगपती आहे.

तृप्ती डिमरी नुकतीच एका कार्यक्रमामध्ये पोहोचली होती, यावेळी तीने सैम मर्चेंटसोबत एक फोटो काढला आहे. सैमसोबत काढलेल्या तिच्या या फोटोची बॉलिवूडच्या वर्तुळात मात्र वेगळीच चर्चा सुरु आहे. दरम्यान, सैम आणि तिच्यात काही नातं आहे की नाही याची अद्याप काही माहिती नाही मात्र दोघांच्या अफेअरच्या चर्चांना मात्र जोर आला आहे.

News Title: tripti dimri affair gossips with sam merchant

महत्त्वाच्या बातम्या-

Pune News | पुण्यातील सवाई गंधर्व महोत्सवात आग लागल्याने मोठी खळबळ

Aishwarya Rai | ती आता लहान राहिलेली नाही!, अtripti dimriमिताभ बच्चन यांची ‘ती’ पोस्ट कुणासाठी???

Entertainment News: मुलगा झाला की मुलगी???, मराठीतील प्रसिद्ध अभिनेत्रीने दिली गोड बातमी

INDvsSA | भारताच्या मागे लागलेलं शुक्लकाष्ठ थांबेना! शमी-चहरनंतर आता ‘हा’ बडा खेळाडू मालिकेतून बाहेर

India vs South Africa | पार वाट लावून टाकली!, ‘या’ खेळाडूंनी दक्षिण आफ्रिकेची हालत केली खराब

Krishna Varpe

Mahesh Patil

Join WhatsApp Group

Join Now