Triglycerides Heart Risk | कोलेस्ट्रॉलला हृदयविकाराचा मुख्य शत्रू मानलं जातं, पण त्याहूनही जास्त घातक ठरू शकणारा घटक म्हणजे ‘ट्रायग्लिसराइड्स’. रक्तात ट्रायग्लिसराइड्सचे प्रमाण वाढल्यास हृदयविकाराचा आणि स्ट्रोकचा धोका लक्षणीयरीत्या वाढतो. ही चरबीची एक प्रकारची रासायनिक संरचना असून, जास्त कॅलरीज आणि साखर असलेले अन्न खाल्ल्यास शरीरात वेगाने साठते.
ट्रायग्लिसराइड्स म्हणजे नेमकं काय? :
ट्रायग्लिसराइड्स (Triglycerides) म्हणजे रक्तात आढळणारे फॅट्स (Lipids) आहेत. अन्नातून मिळणाऱ्या उर्जेचा वापर शरीरात झाला नाही की ती अतिरिक्त ऊर्जा ट्रायग्लिसराइड्सच्या स्वरूपात पेशींमध्ये साठवली जाते. हाय कार्बोहायड्रेटयुक्त आहार, बैठी जीवनशैली आणि मद्यपान हे त्याच्या वाढीचे मुख्य कारण आहे.
वैद्यकीय भाषेत ही स्थिती ‘हायपरट्रिग्लिसरिडेमिया’ म्हणून ओळखली जाते.
Triglycerides Heart Risk | ट्रायग्लिसराइड्सची पातळी किती असावी?
150 पेक्षा कमी – सामान्य (Normal)
150 ते 199 – थोडी जास्त (Borderline)
200 ते 499 – जास्त (High)
500 किंवा अधिक – खूप जास्त (Very High)
ट्रायग्लिसराइड्स कमी करण्यासाठी ‘हे’ करा उपाय :
दररोज व्यायाम करा : किमान ३० मिनिटांचा हलका-फुलका चालणे, सायकल चालवणे किंवा पायऱ्या चढणं उपयुक्त ठरतं.
साखर आणि पांढऱ्या मैद्याचे पदार्थ टाळा : फ्रुक्टोज, शुगर, बेकरी पदार्थ, सॉफ्ट ड्रिंक्स यांचा वापर कमी करा.
वजन कमी करा : वजन वाढलं की ट्रायग्लिसराइड्सचे प्रमाणही वाढतं. कॅलरी कमी करून शरीरातली चरबी घटवा.
हेल्दी फॅटचा समावेश करा : ऑलिव्ह ऑईल, ओमेगा-3 फॅटी अॅसिड्स (मॅकेरल, सॅल्मन मासे) खा. लाल मांस कमी करा.
मद्यपान टाळा : अल्कोहोलमधील साखर आणि कॅलरीज ट्रायग्लिसराइड्स वाढवतात. गंभीर स्थितीत दारू पूर्णपणे बंद करावी.
कोणताही आजार झाला की उपचार होतात, पण तो टाळणं हे अधिक महत्त्वाचं आहे. ट्रायग्लिसराइड्स वाढणं ही निदानपात्र पण दुर्लक्षित समस्या आहे. वेळेत तपासणी करून, आहार व व्यायामाच्या मदतीने आपण हे नियंत्रणात ठेवू शकतो.






