स्वित्झर्लंड विसरा, हनीमूनसाठी बेस्ट आहेत भारतातील ‘ही’ 4 ठिकाणं!

On: September 16, 2024 12:40 PM
Travel News October Tour Plan 2024 in Kashmir
---Advertisement---

Travel News | अनेकांना स्वित्झर्लंडबद्दल एक वेगळंच आकर्षण असतं. पण, स्वित्झर्लंडप्रमाणेच किंवा त्यापेक्षाही अधिक सुंदर ठिकाणे ही आपल्या भारत देशात आहेत. मात्र, या ठिकाणाबद्दल फार कमी लोकांना माहीत आहे. ऑक्टोबर आणि नोव्हेंबर या दोन महिन्यात तर या ठिकाणाचे सौंदर्य अजूनच खुलते. हनीमूनसाठी किंवा असंही फिरायला जायचा प्लॅन करत असाल तर यंदा तुम्ही या 4 ठिकाणी नक्कीच भेट देऊ शकता. ही चार ठिकाणे कोणती आहेत, ते पाहुयात. (Travel News)

‘या’ 4 ठिकाणी ऑक्टोबरमध्ये नक्की भेट द्या

खज्जियार : हिमाचल प्रदेशमधील खज्जियार हे एक अतिशय सुंदर ठिकाण आहे.ज्याला मिनी स्वित्झर्लंड देखील म्हटलं जातं. येथील खज्जियार तलाव या ठिकाणी अनेक चित्रपटाचे शूटिंग देखील झाले आहे. याशिवाय येथे अनेक दऱ्या आणि टेकड्या आहेत, ज्या ट्रेकिंग प्रेमींना खूप आवडतात. येथे एक सुंदर तलाव आहे ज्याचे पाणी हिरव्या आणि निळ्या रंगात दिसते. त्यामुळे पुढच्या महिन्यात या ठिकाणी नक्कीच भेट द्या. (Travel News)

औली : उत्तराखंडचे औली हे भारताचे मिनी स्वित्झर्लंड आहे, ते उत्तराखंडच्या चमोली जिल्ह्यात येते.पर्यटक यथे विशेषत: स्कीइंग आणि बर्फवृष्टीचा आनंद घेण्यासाठी येत असतात.औलीमध्ये अनेक नैसर्गिक ठिकाणे आहेत, जी पर्यटकांना त्यांच्या आकर्षणाने प्रभावित करतात. दर्शनासाठी नंदा देवी मंदिर आहे. कैलास मानसरोवर यात्राही येथूनच सुरू होते. त्यामुळे हे स्थळ धार्मिकदृष्ट्या देखील महत्वपूर्ण मानले जाते.

जम्मू आणि काश्मीर : जम्मू-काश्मीरला भारताचे ‘नंदनवन’ म्हणून ओळखले जाते. केवळ भारतातीलच नव्हे तर विदेशातील देखील अनेक पर्यटक येथे भेट देतात. हिवाळ्यात तर येथील सौंदर्य स्वर्गापेक्षा कमी नाही. जम्मू आणि काश्मिरमध्ये बॉलीवूडमधील अनेक चित्रपटांचे शूटिंग झाले आहे आणि परदेशातूनही लोक या ठिकाणी भेट देण्यासाठी येतात. काश्मीरचे प्रमुख आकर्षण असलेले दाल सरोवर हे हिवाळ्यात आकर्षणाचे ठिकाण आहे. श्रीनगर, गुलमर्ग, पहलगाम सारखी ठिकाणे पर्यटकांना  नेहमीच आकर्षित करतात. (Travel News)

News Title :  Travel News October Tour Plan 2024 in Kashmir

महत्वाच्या बातम्या-

शनीदेवाच्या कृपादृष्टीमुळे ‘या’ राशी होणार गडगंज श्रीमंत, मिळणार अमाप पैसा

UPI ​​व्यवहाराची मर्यादा वाढली; एका दिवसात ‘इतके’ पैसे ट्रान्सफर होणार

ऐश्वर्याने काढली वेडिंग रिंग, अभिषेकपासून घेतली फारकत?; व्हिडिओच आला समोर

पंजाबराव डख यांचा पावसाबद्दल महत्वाचा अंदाज, शेतकऱ्यांनाही दिला सल्ला

धनगर आरक्षणाबाबत शिंदे सरकारचा मोठा निर्णय!

Join WhatsApp Group

Join Now