7-सीटर कार हवीये, पण बजेट कमी आहे? तर ‘या’ 3 जबरदस्त कार आहेत सर्वात बेस्ट

On: July 26, 2025 5:26 PM
7 seater car options
---Advertisement---

7 seater car options | मोठ्या कुटुंबासाठी कार खरेदी करताय? कमी बजेटमध्ये भरपूर जागा, चांगले मायलेज आणि आधुनिक फीचर्स असलेल्या 7-सीटर MPV कार्स आता बाजारात उपलब्ध आहेत. Renault Triber, Maruti Ertiga आणि Toyota Rumion या तीन कार्स सध्या खूपच लोकप्रिय ठरत आहेत.

सध्या भारतात मोठ्या कुटुंबांसाठी परवडणाऱ्या 7-सीटर कार्सची मागणी वाढली आहे. MPV म्हणजेच Multi-Purpose Vehicle प्रकारातील या कार्स प्रवासासाठी आरामदायक असून, शहरात व हायवेवर दोन्ही ठिकाणी योग्य ठरतात. कमी बजेटमध्ये जास्त जागा व उत्तम फीचर्स देणाऱ्या या कार्सचा विचार खरेदीसाठी नक्की करता येईल.

Renault Triber – बजेट कुटुंबांसाठी सर्वोत्तम :

Renault Triber ही भारतातील सर्वात परवडणारी 7-सीटर कार आहे. तिची किंमत ₹6.15 लाख ते ₹8.98 लाख (एक्स-शोरूम) दरम्यान आहे. 1.0 लीटर पेट्रोल इंजिनसह येणारी ही कार 18-20 किमी/लीटर मायलेज देते. यात ड्युअल एअरबॅग्ज, रिअर पार्किंग कॅमेरा, 8 इंच टचस्क्रीन, डिजिटल डिस्प्ले आणि दुसऱ्या-तिसऱ्या रांगेसाठी AC व्हेंट्सही आहेत. CNG पर्यायही काही डीलरशिपवर उपलब्ध आहे.

7 seater car options | Maruti Suzuki Ertiga – लोकप्रिय आणि विश्वासार्ह :

Maruti Ertiga ही भारतात सर्वाधिक विकली जाणारी 7-सीटर MPV आहे. ₹8.97 लाख ते ₹13.26 लाख (एक्स-शोरूम) या किंमतीत उपलब्ध असून 1.5 लीटर स्मार्ट हायब्रिड पेट्रोल इंजिनसह येते. (7 seater car options)

पेट्रोल व्हर्जन 20.51 किमी/लीटर तर CNG व्हर्जन 26.08 किमी/किग्रॅम मायलेज देतो. इंटिरियरमध्ये स्मार्ट हायब्रिड सिस्टम, टचस्क्रीन, ऑटो क्लायमेट कंट्रोल, आणि स्टिअरिंग माउंटेड कंट्रोल्ससह उत्तम फीचर्स आहेत.

Toyota Rumion – प्रीमियम बॅजसह Ertiga चा पर्याय :

Toyota Rumion ही Maruti Ertiga चीच रिबॅज व्हर्जन असून ती किंमतीत थोडी जास्त आहे – ₹10.54 लाख ते ₹13.83 लाख (एक्स-शोरूम). तीच 1.5L K-Series इंजिन व तीच फीचर्स असले तरी Toyota चा बॅज आणि आफ्टर सेल्स सर्व्हिसमुळे ती अधिक प्रीमियम वाटते. मायलेजही Ertiga सारखंच आहे.

News Title: Top 3 Budget 7-Seater Cars in India for Big Families – Triber, Ertiga, Rumion Compared

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now