‘या’ राशीला मिळणार बक्कळ पैसा; संकटातून सुटका होणार

On: May 2, 2024 8:24 AM
Today Horoscope
---Advertisement---

Today Horoscope l मेष:- गैरसमजुतीतून त्रास संभवतो. सामुदायिक गोष्टींत फार लक्ष घालू नका. जवळचा प्रवास तूर्तास टाळावा. बोलण्यातून इतरांवर छाप पाडाल. शुभ रंग जांभळा, शुभ अंक ४

वृषभ:- उत्तम वैवाहिक सौख्य लाभेल. प्रेमाच्या दृष्टीने मैत्रीत सुधारणा होईल. काही कौटुंबिक चिंता सतावतील. हौस भागवणे शक्य होईल. शुभ रंग विटकरी, शुभ अंक ८

मिथुन:- मानसिक आंदोलनाला आवर घालावी. मनातील विचित्र कल्पना काढून टाका. क्षणिक सौख्याने हुरळून जाऊ नका. काही गोष्टी इच्छेविरूद्ध कराव्या लागतील. महत्त्वाची कामे आज टाळावीत. शुभ रंग गुलाबी, शुभ अंक २

Today Horoscope l कर्क:- फार विचार करत बसू नका. खोट्या गोष्टींचा आधार घेऊ नका. डोळे झाकून कोणतेही कृत्य करू नका. फसवणुकीपासून सावध रहा. मानसिक चंचलता जाणवेल. शुभ रंग पोपटी, शुभ अंक ९

सिंह:- आर्थिक लाभावर लक्ष केंद्रित करा. तुमच्यातील चांगल्या गुणांचे कौतुक केले जाईल. चैनीच्या वस्तू खरेदी कराल. मिळालेल्या लाभाबाबत समाधानी रहा. शुभ रंग पांढरा, शुभ अंक ७

कन्या:- विशाल दृष्टिकोन ठेवावा लागेल. तुमच्यातील सुप्त गुण दाखवण्याची संधी मिळेल. भौतिक सुखापासून दूर राहाल. पत्नीचे वर्चस्व जाणवेल. आर्थिक धनलंच संभवतो. शुभ रंग नारंगी, शुभ अंक ५

तूळ:- कमी श्रमातून चांगला लाभ होईल. अपचनाचा त्रास जाणवेल. नातेवाईकांची नाराजी दूर करावी लागेल. महिलांना उत्तम गृहिणी पदाचा लाभ मिळेल. शुभ रंग पिवळा, शुभ अंक 3

वृश्चिक:- नवीन कामात सावधानता बाळगा. कौटुंबिक कामात विशेष लक्ष घालावे लागेल. प्रणयराधनेत सक्रियता वाढेल. आर्थिक लाभापेक्षा कामाचा आनंद मिळवाल. भागिदारीतून मनाजोगा नफा मिळेल. शुभ रंग काळा, शुभ अंक १

धनू:- कौटुंबिक वातावरण तप्त राहील. जोडीदाराविषयी गैरसमज वाढू शकतात. हाताखालील नोकरांचे उत्तम सहकार्य लाभेल. व्यसनाच्या आहारी जाऊ नका. शुभ रंग निळा, शुभ अंक ८

मकर:- जवळच्या प्रवासात काळजी घ्या. भावंडांशी दुरावा वाढू शकतो. प्रेमसौख्याला अधिक बहार येईल. मुलांशी क्षुल्लक कारणांवरून खटके उडू शकतात. करमणुकीत अधिक वेळ घालवाल. शुभ रंग लाल, शुभ अंक ६

कुंभ:- बौद्धिक कामात सक्रिय राहाल. धार्मिक यात्रांचे आमंत्रण घेऊ नये. घरातील वातावरण प्रसन्न राहील. रेस-जुगारातून नुकसान संभवते. प्रवासात किरकोळ अडचणी येऊ शकतात. शुभ रंग हिरवा, शुभ अंक ४

Today Horoscope l मीन:- आपलेच म्हणणे खरे कराल. अती आत्मविश्वास बाळगून चालणार नाही. उघड-उघड शत्रुत्व पत्करू नका. जमिनीचे व्यवहार मार्गी लागतील. किरकोळ दुखापत संभवते. शुभ रंग जांभळा, शुभ अंक २

News Title – Today Horoscope

महत्त्वाच्या बातम्या

सख्ख्या भावांमध्ये वाद?; रत्नागिरी-सिंधुदुर्गमध्ये मोठी खळबळ

‘तो हरणारच’; माजी मंत्र्यांनी लावली 9 लाखांची पैज

‘या’ जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता; हवामान विभागाकडून मोठी अपडेट

“दमदाटी करायची भाषा करणं सोडून द्या नाहीतर…”, अमोल कोल्हेंचा अजित पवारांना इशारा

“मी इतक्या लाख मतांनी विजयी होईल”, नारायण राणेंचं मोठं वक्तव्य

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now