या राशीच्या व्यक्तींनी दुचाकी वाहन चालवताना सावधानता बाळगावी

On: April 21, 2024 8:19 AM
Today Horoscope
---Advertisement---

Today Horoscope l मेष:- मनातील इच्छा पूर्ण होईल. कौटुंबिक खर्चाचा ताळमेळ घालावा. बढतीसाठी प्रयत्न करावेत. मित्रांशी मतभेद संभवतात. तुमच्या शब्दाला वजन प्राप्त होईल. शुभ अंक ३, शुभ रंग निळा

वृषभ:- कामाचा आवाका लक्षात घ्यावा. वेळेचे भान ठेवावे. काही बदल अनपेक्षितरीत्या घडून येतील. प्रयत्नात कसूर करू नका. कष्टाला पर्याय नाही हे लक्षात ठेवा. शुभ अंक २, शुभ रंग गुलाबी

मिथुन:- मनातील नैराश्य दूर सारावेत. क्षणिक आनंदाने हुरळून जाल. प्रवासात किरकोळ अडचण येवू शकते. कौटुंबिक प्रश्न आधी विचारात घ्या. झोपेची तक्रार जाणवेल. शुभ अंक ४, शुभ रंग पांढरा

कर्क:- कर्तव्यापेक्षा इच्छेला महत्व द्याल. मनातील विचार काढून टाकावे. जोडीदाराच्या शांत स्वभावाने अचंबित व्हाल. मानसिक ताण दूर करण्याचा प्रयत्न करावा. फार हट्टीपणा करू नका. शुभ अंक ९, शुभ रंग हिरवा

सिंह:- मनातील जुनी आकांक्षा पूर्ण होईल. स्त्रियांची मदत मोलाची ठरेल. नवीन ओळखी दृढ होतील. मनाजोगी खरेदी करता येईल. जोडीदाराशी वाद संभवतात. शुभ अंक ८, शुभ रंग नारंगी

Today Horoscope l :- हातातील कामात यश येईल. हित शत्रूंचा त्रास कमी होईल. चुगलखोर व्यक्तींपासून सावध राहावे. नातेवाईकांशी सलोखा ठेवावा लागेल. मनात गैरसमजाला थारा देऊ नका. शुभ अंक ५, शुभ रंग काळा

तूळ:- क्षुल्लक गोष्टींनी मुलांवर चिडचिड करू नका. खेळाची आवड जोपासता येईल. रागावर नियंत्रण ठेवावे लागेल. कामाचा वेग वाढवता येईल. उत्साहाने नवीन गोष्टीत लक्ष घालाल. शुभ अंक ७, शुभ रंग पोपटी

वृश्चिक:- घरगुती वातावरण शांततेचे ठेवावे. लहान-सहान गोष्टी फार मनावर घेऊ नका. घरात तुमच्या शब्दाला महत्व दिले जाईल. कामाच्या ठिकाणी नवीन लोकांची मदत घेता येईल. काही बदल समजून घेऊन वागावे. शुभ अंक ५, शुभ रंग विटकरी

धनू:- वाहन वेगावर नियंत्रण ठेवावे. भावंडांशी मतभेद वाढवू नका. हातापायाला किरकोळ इजा संभवते. अधिकाराचा गैरवापर टाळावा. कौटुंबिक खर्च आटोक्यात ठेवावा. शुभ अंक २, शुभ रंग जांभळा

मकर:- धार्मिक कामात मन गुंतवावे. बोलतांना शब्द जपून वापरावेत. कौटुंबिक खर्च नव्याने विचारात घ्यावा. जोडीदाराचा हट्ट पुरवावा लागेल. लहरीपणाने वागू नका. शुभ अंक ८, शुभ रंग लाल

Today Horoscope l कुंभ:- आपल्याच हट्टावर ठाम राहाल. दुचाकी वाहन चालवताना सावधानता बाळगावी. नसते साहस करू नका. संयम सोडून चालणार नाही. सारासार विचारावर भर द्यावा. शुभ अंक ३, शुभ रंग निळा

मीन:- सामुदायिक गोष्टीत फार लक्ष घालू नका. कामे उगाचच अडकून पडल्यासारखी वाटू शकतात. गैरसमजुतीतून वाद वाढू देऊ नका. कर्ज प्रकरणे तूर्तास टाळावीत. प्रवासात काळजी घ्यावी. शुभ अंक १, शुभ रंग पिवळा

News Title – Today Horoscope

महत्त्वाच्या बातम्या

हवा फिरली?, ‘या’ एका गोष्टीत राहुल गांधींनी नरेंद्र मोदींना दिली पहिल्यांदाच मात

“भाजपसोबत आल्यापासून आमच्या अदानी-अंबानींसोबतही ओळखी झाल्या”

काँग्रेसचेच चरित्र षडयंत्र रचण्याचे!, काँग्रेसच्या ‘त्या’ आरोपांवर धीरज घाटेंचं सडेतोड उत्तर

राज्यातील ‘या’ भागात अवकाळी पावसानं घातला धुमाकूळ; शेतकऱ्यांचं मोठं नुकसान

सुनील तटकरेंची डोकेदुखी वाढली, दुसऱ्या सुनील तटकरेंनी भरला उमेदवारी अर्ज

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now