TMKOC | ‘तारक मेहता का उल्टा चष्मा'(Tarak Mehta Ka Ooltah Chashmah) ही लोकप्रिय मालिका गेल्या अनेक वर्षांपासून प्रेक्षकांच्या मनावर राज्य करत आहे. या मालिकेतील कलाकारांनाही प्रेक्षकांनी भरभरून प्रेम दिलं. मात्र गेल्या काही दिवसांपासून या मालिकेतील अनेक कलाकारांनी मालिकेला रामराम ठोकला आहे. दरम्यान आता आणखी एका कलाकाराने मालिका सोडली आहे.
TMKOC च्या चाहत्यांसाठी धक्कादायक बातमी
गेल्या काही वर्षांत तारक मेहता का उल्टा चष्मा (TMKOC) या मालिकेतील काही कलाकरांनी मालिकेला रामराम केला आहे. मात्र, आता यामधील मुख्य भूूमिका साकारत असलेले कलाकार देखील मालिका सोडत असल्याचं दिसतंय. टप्पूसेनामधील महत्त्वाची भूमिका साकारणारा कलाकार गोली म्हणजेच कुश शाहा मालिका सोडणार असल्याचं म्हटलं आहे.
सोशल मीडियावर पोस्ट-
समोर आलेल्या माहितीनुसार एका फॅनपेजवर गोलीची भूमिका साकारणारा अभिनेता कुश शाहचा फोटो पोस्ट करण्यात आला आहे. ज्या व्यक्तीचं हे फॅनपेज आहे, त्याची कुश शाहसोबत भेट झाली होती. या भेटीदरम्यान कुश शाहा न्यूयॉर्कमधील शिक्षण पूर्ण करण्यासाठी मालिका सोडणार असल्याचं सांगितलं. यासंदर्भातील पोस्ट आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
‘स्टॅच्यू ऑफ लिबर्टीच्या दिशेने जाताना माझी अचानक भेट कुश शाह उर्फ गोलीशी झाली. त्याने मला सांगितलं की त्याने ‘तारक मेहता’ ही मालिका सोडली असून न्यूयॉर्कमध्ये तो शिक्षण पूर्ण करतोय.’ या पोस्टवर नेटकऱ्यांकडून प्रतिक्रियांचा वर्षाव होतोय. एका चाहत्याने लिहिलं, ‘आता तर या मालिकेत काहीच मनोरंजक राहिलं नाही. माझे सर्व आवडते कलाकार मालिका सोडून जातायत.’ तर दुसऱ्याने मालिका सोडण्याचा निर्णय कुशसाठी चांगला असल्याचं म्हटलंय.
News Title : TMKOC fans shocking news
महत्त्वाच्या बातम्या-
राज्यातील ‘या’ भागाला हवामान खात्याचा अलर्ट, पुढील 6 दिवसांपर्यंत कोसळणार पाऊस
पुणेकरांनो काळजी घ्या! पुढील तीन दिवस धो-धो पाऊस बरसणार, यलो अलर्ट जारी
“विखे कुटुंबियांचा मला अभिमान, लवकरच..”; निलेश लंकेंचं भुवया उंचावणारं वक्तव्य
उपोषणस्थळावरून वडेट्टीवारांनी लावला थेट मुख्यमंत्र्यांना फोन, शिंदे म्हणाले ‘त्यांना म्हणावं…’
रिल स्टार ‘माऊ’ घरातून अचानक गायब; सुसाईड नोट सापडल्याने खळबळ






