टायगर श्रॉफने पुण्यात खरेदी केलं घर; किंमत ऐकून बसेल धक्का

On: March 19, 2024 2:43 PM
Tiger Shroff Threat
---Advertisement---

Tiger Shroff | अभिनेता टायगर श्रॉफ सध्या ‘बडे मिया छोटे मिया’ चित्रपटामुळे चर्चेत आहे. या सिनेमाचं तो जोरदार प्रमोशन करत आहेत. एकीकडे सिनेमाची चर्चा असताना त्याच्याबद्दल मोठी माहिती समोर आली आहे. त्याने नुकतंच पुण्यात एक आलिशान घर खरेदी केलं आहे.

टायगरच्या नव्या घराची किंमत कोट्यवधींमध्ये आहे. सध्या सर्वत्र टायगरच्या नव्या घराची चर्चा रंगली आहे. टायगरच्या नव्या घराची किंमत तब्बल 7.5 कोटी रुपये आहे. त्याने आपल्या नव्या घरासाठी 52.5 लाख रुपये स्टॅम्प ड्यूटीदेखील भरली आहे. ही प्रॉपर्टी अभिनेत्याच्या 3.5 लाख रुपये महिना लीजवर दिली आहे.

टायगर श्रॉफ होणार पुणेकर!

टायगरने मुंबईनंतर आता पुण्यातही आलिशान घर घेतलं आहे. त्यामुळे तो आता पुणेकर होणार आहे. काही रिपोर्टनुसार टायगरची ही आलिशान मालमत्ता 4248 चौरस फुटांची असून, हडपसरमधील प्रीमियम ‘यु पुणे’ प्रकल्पाचा भाग आहे. स्थानिक रिअल इस्टेट हेवीवेट पंचशील रियल्टीद्वारे ती बांधली जात आहे.

टायगरने (Tiger Shroff ) 5 मार्च रोजीच नोंदणी करून यासाठी 52.5 लाख रुपये भरले आहेत. ही मालमत्ता तात्काळ लीजवर देण्यात आली असल्याची माहिती समोर येत आहे. या मालमत्तेसाठी दरमहा सुमारे साडेतीन लाख रुपये भाडे मिळत आहे. म्हणजेच टायगर भाड्यातून चांगलीच कमाई करणार आहे.

टायगर श्रॉफने पुण्यात खरेदी केलं घर

आता टायगरने हे घर घेतलं म्हटल्यावर तो पुण्यात शिफ्ट होणार काय?, अशा चर्चा आहेत. मात्र, सध्या तरी टायगर श्रॉफ हा पुण्यात शिफ्ट होणार नाही. तो मुंबईतच राहून आपली अभिनय कारकीर्द सुरू ठेवणार असल्याची माहिती आहे.

दरम्यान, टायगर (Tiger Shroff ) बॉलीवूड अभिनेता अक्षय कुमारसोबत ‘बडे मियाँ छोटे मियाँ’ या चित्रपटात स्क्रिन शेअर करताना दिसणार आहे. या दोघांची जोडी पडद्यावर पाहण्यासाठी चाहते आतुर आहेत. दोघेही चित्रपटाचं जोरदार प्रमोशन करत आहेत.

News Title-  Tiger Shroff bought a house in Pune

महत्त्वाच्या बातम्या –

अगदी काही मिनिटांत घरबसल्या ड्रायव्हिंग लायसन्स मिळवू शकता! अशाप्रकारे करा अर्ज

इंजिनियर्स तरुणांना सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! या विभागात भरती प्रक्रिया सुरु

EV सेगमेंटमध्ये लाँच होणार ही जबरदस्त कार! या तगड्या कारशी स्पर्धा करणार

यंदाचा IPL हंगाम असणार खास; या दिग्गज व्यक्तीची होणार एंट्री

“भाजपने स्वत:ची चड्डी सोडून काँग्रेसचं लंगोट बांधलंय”

Join WhatsApp Group

Join Now