Bopdev Ghat Gang Rape l गेल्या काही दिवसांपूर्वी पुण्यातील बोपदेव घाटात तरुणीवर अत्याचार झाल्याची घटना घडली होती. मात्र आता या प्रकरणात अखेर पोलिसांना अत्यंत महत्त्वाचे धागेदोरे हाती लागले आहेत. या घटनेतील दोन संशयितांना गुन्हे शाखेने नागपूर मधून ताब्यात घेतले आहे. तसेच बोपदेव घाटातील घटनेमुळे संपूर्ण महाराष्ट्र हादरला आहे.
बोपदेव घाटातील संशयितांना पोलिसांनी घेतलं ताब्यात :
यासंदर्भात अधिक माहिती अशी की, बोपदेव घाटातील धक्कादायक घटनेमधील दोन संशयित तरुणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. तसेच कोंढव्यातील येवलेवाडी परिसरातील एका तरुणाला देखील पोलिसांनी ताब्यात घेतल्याची माहिती मिळाली आहे. मात्र या घाटबेतील संशयितांना पोलिसांनी अद्याप अटक केलेली नाही. कारण सध्या त्यांची सखोल चौकशी सुरू आहे.
बोपदेव घाटात तरुणीवर झालेल्या धक्कादायक सामूहिक बलात्कार प्रकरणात पोलिसांनी घटनास्थळाच्या परिसरातील तब्बल 40 गावे, वाड्या, वस्तींवरील अशा मिळून 450 नागरिकांची चौकशी केली आहे. तसेच पुणे जिल्ह्यातील घाट, टेकड्यांच्या परिसरात लूटमार करणारे, विनयभंग, बलात्कार असे गंभीर गुन्हे दाखल असलेल्या सराइतांची पुणे पोलिसांकडून चौकशी करण्यात आली आहे.
Bopdev Ghat Gang Rape l पोलीस यंत्रणा अलर्ट मोडवर :
3 ऑक्टोबर बोपदेव घाट परिसरात एक धक्कादायक प्रकार घडला आहे. रात्री मित्राबरोबर फिरायला आलेल्या महाविद्यालयीन तरुणीवर या घाटात सामूहिक बलात्कार करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेतील पसार झालेल्या आरोपींचा माग काढण्यासाठी पोलिसांनी तब्बल 60 पथके तयार केली आहेत. मात्र गेल्या पंधरा दिवसांत बोपदेव घाटमार्गे गेलेल्या 50 हजार मोबाइल वापरकर्त्यांची माहिती देखील गोळा करण्यात आली आहे.
पोलीस या माहितीचे तांत्रिक विश्लेषण करणार आहे. तसेच बोपदेव घाटातील मोबाइल संपर्क यंत्रणा क्षीण असल्याने तांत्रिक तपासात अडथळे देखील आले आहेत. याशिवाय आरोपी सासवडमार्गे पसार झाल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तसेच घटनास्थळापासून तब्बल 70 ते 80 किलोमीटरपर्यंतचे सीसीटीव्ही चित्रीकरण देखील पोलिसांकडून तपासण्यात आले आहे.
News Title – Three suspects arrested in bopdev ghat gang rape case
महत्त्वाच्या बातम्या-
अजितदादा आणि प्रकाश आंबेडकरांनी एकत्र यावं; ‘या’ बड्या आमदाराची इच्छा
IRCTC चं नोव्हेंबर स्पेशल टुर पॅकेज, ‘या’ मंदिरांना स्वस्तात भेट देण्याची संधी!
डिझेल वाहने बंद होणार? डेडलाईन जाहीर
दोन अग्नीवीरांचा मृत्यू; मृत्यूचे कारण ऐकून अंगावर येईल काटा
पुणे हादरलं! प्रेयसीला लॉजवर नेलं अन् त्याने..; पुढचा घटनाक्रम ऐकून थरथराल






