मुंबई | शिंदे गटाच्या महिला नेत्यानं सुषमा अंधारे या वाघीण नसून माकडीण अशी बोचरी टीका केली आहे. यामुळे आता वाद आणखी वाढण्याची शक्यता आहे.
सुषमा अंधारे (Sushma Andhare) यांच्या वारकरी संप्रदायाबद्दल केलेल्या आक्षेपार्ह भाषणाच्या व्हिडीओ क्लीप सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाल्या आहेत.
या व्हिडीओत अंधारे यांनी संत ज्ञानेश्वर, संत एकनाथ, संत नामदेव यांच्याविषयी केलेल्या वक्तव्यांवरून वारकरी संप्रदाय आक्रमक झाला आहे.
महानुभाव पंथाने देखील अंधारे ज्या पक्षात असतील त्या पक्षाला मतदान न करण्याचा निर्णय घेतला आहे. माफी मागितल्यानंतर देखील विरोधाची धार कमी न झाल्यामुळे ठाकरे गट चांगलाच अडचणीत सापडल्याचं पाहायला मिळतंय.
दरम्यान, अंधारे यांना आम्ही रामायण आणि महाभारत ग्रंथ भेट देणार आहोत. वेळ पडली तर त्यांना चोपही देऊ. त्यांची पळता भुई थोडी होईल. महाराष्ट्रात त्यांना फिरू देणार नाही, असा इशाराही त्यांनी यावेळी दिला आहे.
महत्त्वाच्या बातम्या-






