विराट कोहलीसोबत पंगा घेणाऱ्या ‘या’ खेळाडूला संघातून काढलं!

On: August 28, 2023 6:28 PM
---Advertisement---

अफगाणिस्तान संघ गेल्या अनेक महिन्यांपासून आपल्या काही खेळाडूंच्या रागीट स्वभावामुळे चर्चेत आहे. आता अफगाणिस्तानने या खेळाडूंना संघात पुन्हा स्थान दिलं नाही. आशिया कप 2023 साठी अफगाणिस्तानने संघ जाहीर केला आहे. अफगाणिस्तानच्या 17 सदस्यीय संघात वेगवान गोलंदाज नवीन उल हक याचा समावेश करण्यात आलेला नाही. हा तोच नवीन उल-हक आहे जो विराट कोहली (Virat Kohli) आणि गंभीर यांच्यातील वादाचं कारण ठरला होता.

इंडियन प्रीमियर लीग 2023 मध्ये लखनौ सुपर जायंट्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगलोर यांच्यातील सामन्यात विराट कोहली(Virat Kohli) आणि नवीन-उल-हक यांच्यात वाद झालेला. इतकंच नाही तर मॅच संपल्यानंतर विराट कोहली नवीन उल-हकशी हात मिळवायला गेला तेव्हा नवीनं कोहलीचा हात झटकून दिला होता.

आयपीएलच्या 16व्या हंगामात नवीन एलएसजीच्या संघात होता. चाहत्यांना आशिया चषकात पुन्हा एकदा समोरासमोर पाहायचं होतं, पण अफगाणिस्तान क्रिकेट बोर्डाने नवीनचा संघात समावेश केला नाही.

दोघांमधला हा संघर्ष फक्त मैदानापुरता मर्यादीत नव्हता तर सोशल मीडियावर देखील नवीनने अनेकदा विराट कोहलीला टार्गेट केलं होतं. आता आशिया चषकासाठी अफगाणिस्तानचा संघ जाहीर झाला असताना नवीन-उल-हकला डच्चू देण्यात आलाय. त्याने अफगाणिस्तानसाठी 7 एकदिवसीय सामने खेळले आहेत ज्यात त्याच्या नावावर 14 विकेट आहेत.

संघ जाहीर झाल्यानंतर नवीनने सोशल मीडियावर पोस्ट करत त्याची प्रतिक्रिया दिली आहे. नवीनने सोशल मीडियावर नवीनने त्याचा फोटो शेअर केला आहे. “इससे कोई फर्क नहीं पड़ता कि आपकी आंखें अंधेरे के साथ कितनी अच्छी तरह से तालमेल बिठाती है. आप इसे रोशनी समझने की गलती कभी नहीं करेंगे.”, असं कॅप्शन त्याने दिलंय.

अफगाणिस्तान संघाबद्दल बोलायचं झालं तर नवीनसोबतच शाहिदुल्ला कमाल आणि वफादर मोमंद यांनाही संघात स्थान मिळालेलं नाही.

महत्त्वाच्या बातम्या-

Babita Durande

Babita Durande

Join WhatsApp Group

Join Now