हा खोक्यांचा विजय आहे, सत्याचा विजय नाही- संजय राऊत

On: February 17, 2023 7:48 PM
---Advertisement---

मुंबई | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या गटाला शिवसेनेचं नाव (Shivsena) आणि धनुष्यबाण चिन्ह मिळालं आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने याबाबतचा आदेश दिला आहे. यावर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

संजय राऊत ( Sanjay Raut ) यांनी यावेळी शिंदे गटासह निवडणूक आयोगावर हल्लाबोल केला आहे. याशिवाय पुढील काळात न्यायालयात या निर्णयावर आव्हान देणार असल्याचं स्पष्ट केलं आहे.

हा खोक्यांचा विजय आहे. सत्याचा विजय नाही. श्रीरामाचा धनुष्यबाण जर रावणाला मिळाला, सत्यमेव जयते खोडून असत्यमेव जयते असा केला पाहिजेजो पक्ष बाळासाहेब ठाकरे यांनी लाखों शिवसैनिकांनी रक्त सांडून उभा केला तो पक्ष बाजारबुनगे विकत घेतात. त्यामुळे निवडणूक आयोगावरील विश्वास जनतेने गमावला आहे, असं राऊत म्हणालेत.

महाराष्ट्राची राजधानी असलेल्या मुंबई ताब्यात घेण्यासाठीचा हा फास आहे. माझा आणि निवडणूक आयोगावर विश्वास नाही असेही संजय राऊत यांनी म्हटलं आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

Babita Durande

Babita Durande

Join WhatsApp Group

Join Now