‘मला त्यांनी नग्न केलं होतं’; मृणाल दिवेकरचा धक्कादायक खुलासा

On: September 13, 2023 11:17 AM
---Advertisement---

मुंबई | लहानपणी आपल्यासोबत घडलेल्या चांगल्या-वाईट गोष्टींचा आपल्यावर खूप परिणाम होतो. त्यात एखादी वाईट गोष्ट आपल्यासोबत घडली तर ती आयुष्यभर मनात राहते. अशाच एका वाईट प्रसंगाला सोशल मीडिया स्टार मृणाल दिवेकरला सामोरं जावं लागलंय. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत तिने एक धक्कादायक खुलासा केला आहे.

मृणालने मुलाखतीत लहान असताना तिच्याबरोबर घडलेला एक वाईट प्रसंग सांगितला. एका ट्युशन टिचरने आपल्याला नग्न केलं होतं, असा खुलासा मृणालने केला आहे.

माझ्या एका ट्युशन टिचरने मी होमवर्क केला नव्हता म्हणून मला नग्न केलं होतं. त्यावेळी मी तिसरीत की चौथीत होते, माझं वय 9-19 वर्षे असेल. मी दोन-तीनवेळा होमवर्क केला नव्हता म्हणून असं केलं होतं, असं मृणालने म्हटलंय.

लहान मुलांना सर्वांसमोर मारणं, त्यांचे कपडे काढणं, तोंडावर चिकटपट्टी लावणं या गोष्टींचे नंतर खूप आघात होतात, असं मृणालने मुलाखतीत सांगितलंय.

मी कराडच्या एका शाळेत शिकत होते, तिथून नंतर इंटरनॅशनल स्कूलमध्ये गेले. त्यामुळे दोन्ही शाळेतला फरक मला लवकर कळला. दोन्ही ठिकाणी दिल्या जाणाऱ्या वागणुकीतला फरक कळला. मी कराडमध्ये होते तिथे मला खूप अडचणी होत्या. ते मला खूप तुच्छतेने वागवायचे. तिथले शिक्षक मारायचे, वाचता आलं नाही, गणित सोडवता आलं नाही तर ते खूप अपमान करायचे, असं मृणालने सांगितलं.

महत्त्वाच्या बातम्या-

Babita Durande

Babita Durande

Join WhatsApp Group

Join Now