तुमचं मानसिक आरोग्य धोक्यात आहे का? ‘ही’ ५ कारणं आणि उपाय जाणून घ्या

On: August 7, 2025 11:52 AM
Mental Health
---Advertisement---

Mental Health Tips | आजच्या धावपळीच्या जीवनशैलीत मानसिक आरोग्याची काळजी घेणं तितकंच महत्त्वाचं आहे, जितकं शारीरिक आरोग्याचं. स्पर्धेचं, करिअरचं, नात्यांचं आणि तंत्रज्ञानाचं दडपण या साऱ्यांचा परिणाम आपल्याला मानसिक पातळीवर जाणवू लागतो. मानसिक तणाव, एकटेपणा आणि चिडचिड हे लक्षणं सहज ओळखता येतात, पण वेळेवर उपाय न केल्यास ते गंभीर मानसिक आजारात बदलू शकतात. (Mental Health Tips)

मानसिक आरोग्यावर परिणाम करणारी ‘ही’ 5 प्रमुख कारणं :

करिअर आणि अभ्यासाचा ताण :

तरुण पिढीवर करिअरमध्ये यशस्वी होण्याचा ताण अधिक वाढला आहे. स्पर्धा, अपयशाची भीती आणि अपुऱ्या संधी यामुळे मानसिक अस्थिरता निर्माण होते.

नात्यांतील संवादाचा अभाव :

आजच्या काळात जवळच्या माणसांशी संवाद साधण्यास वेळच मिळत नाही. एकमेकांची विचारपूस होत नाही. परिणामी, व्यक्त होण्याची गरज अपूर्ण राहते आणि मानसिक तणाव वाढतो.

सोशल मीडियाचा अतिरेक :

इतरांशी तुलना, ‘परफेक्ट लाईफ’चं दडपण, आणि सतत ऑनलाईन राहण्याची गरज यामुळे अनेकांना आत्मविश्वास कमी झाल्याची भावना होते.

स्वतःकडे दुर्लक्ष :

स्वतःच्या भावनांना वेळ न देणे, सतत कामात व्यस्त राहणे, मानसिक विश्रांती न घेणे हे सवयीच्या पातळीवर नुकसानदायक ठरतात. (Mental Health Tips)

स्पर्धेचं आणि यशाचं दडपण :

प्रत्येकजण इतरांपेक्षा पुढे जाण्याच्या शर्यतीत आहे. ही स्पर्धा केवळ आर्थिक किंवा व्यावसायिक नसून, वैयक्तिक आयुष्यातही दबाव वाढवते.

Mental Health Tips | मानसिक आजारांची लक्षणं ओळखा :

– सतत चिडचिड किंवा राग वाढणे

– भीती, चिंता, नकारात्मक विचारांचा अतिरेक

– झोपेच्या सवयी बिघडणे

– एकटेपणा, आत्मकेंद्री विचार

– रडू येणं, आत्मविश्वास गमावणे

ही लक्षणं वारंवार जाणवत असल्यास, तातडीने मदत घेणं आवश्यक आहे.

मानसिक तणावावर हे उपाय करतील चमत्कार :

योग व ध्यान: रोज 15-20 मिनिटांचं ध्यान आणि श्वसनाचं नियमन मन स्थिर ठेवतं.

निसर्गस्नेही जीवनशैली: चार दिवस निसर्गाच्या सान्निध्यात घालवा. पक्ष्यांचे आवाज, हिरवळ आणि शांतता मनाला संजीवनी देतात.

मानसोपचारतज्ज्ञांची मदत: लक्षणं गंभीर वाटल्यास प्रोफेशनल मदत घ्या. मानसोपचार तज्ज्ञ किंवा समुपदेशकाचा सल्ला उपयुक्त ठरतो.

समोरच्या व्यक्तीशी बोला: आपल्या भावना दडपून न ठेवता त्यांच्याशी बोला. संवादाने तणाव कमी होतो.

डिजिटल डिटॉक्स: दर आठवड्यात काही तास सोशल मीडियापासून दूर रहा.

News Title: These 5 Causes Affect Mental Health – Know Symptoms and Remedies in Marathi

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now