केरळ | केरळमध्ये (Keral) धक्कादायक घटना घडली आहे. एका लग्नाच्या (Marriage) जेवणात एक्स्ट्रा पापड न मिळाल्याने तुफान हाणामारी झाल्याचा व्हिडीओ चांगलात व्हायरल होत आहे.
केरळच्या अलाप्पुझा मध्ये लग्नमंडपाचे कुरूक्षेत्र झाल्याचा व्हीडीओ ट्वीटरवर व्हायरल होत आहे. पाहूणे मंडळींना लग्नात पापड कमी पडल्याने वादाला सुरूवात झाल्याचं कळतंय.
लग्नात वर पक्षाच्या काही मंडळींना जेवणाच्या पंगतीत पापड कमी पडले याची तक्रार लागलीच त्यांनी वधू पक्षाला केली. शब्दावरून शब्द वाढत गेला.
या हाणामारीत सहा जण जखमी झाले असून पोलीसांनी दहा जणांवर गुन्हा दाखल केला आहे. व्हीडीओमध्ये अनेक पाहुण्यांचे कपडे देखील फाटल्याचे दिसत आहेत.






