फडणवीसांनी चालवलेल्या ‘त्या’ महागड्या गाडीची होतेय जोरदार चर्चा

On: December 5, 2022 11:56 AM
---Advertisement---

मुंबई | राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे(Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस(Devendra Fadnvis) यांनी रविवारी नागपूर ते शिर्डी या समृद्धी महामार्गाची पाहणी केली. या दौऱ्यादरम्यान उपमुख्यमंत्र्यांनी स्वत: गाडी चावलत प्रवास केला.

बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गाच्या पहिल्या टप्प्याचे काम पूर्ण झाले आहे. या महामार्गाचे उद्घाटन 11 डिसेंबरला पंतप्रधान नरेंद्र मोदी(Narendra Modi) यांच्या हस्ते होणार आहे. या कार्यक्रमासाठी पंतप्रधान नागपूरला येणार आहेत.

या उद्घाटन सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर शिंदे-फडणवीसांनी या महामार्गाची पाहणी केली. यावेळी फडणवीस यांनी स्वत: गाडी चालवत 529 किलोमीटरचे अंतर पार केले. यासाठी त्यांना केवळ 45 मिनिटे लागले. यावेळी मुख्यमंत्रीही त्यांच्या सोबत होते. सध्या याचे फोटो सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहेत.

याचबरोबर चर्चा होतेय ती मुख्यमंत्र्यांनी चालवलेल्या महागड्या गाडीची. फडणवीसांनी चालवलेल्या गाडीचं नाव आहे Mercedes-Benz-G350d. या गाडीची किंमत ऑन रोड 2.6 कोटी रूपये आहे.

या गाडीची खास वैशिष्ट्ये अशी आहेत की, गाडीत टचस्क्रिन डीस्प्ले 12.3 इंचीचा आहे. या गाडीत Apple Carplay, Android Auto कनेक्टिव्हिटी पर्याय आहेत. या गाडीत पाच-सहाजण आरामात बसू शकतात.

या गाडीला 3.0 लिटरचे 6 सिलेंडर इंजिन देण्यात आलं आहे. विशष म्हणजे हे इंजिन ऑटमॅटिक गिअरबाॅक्ससह देण्यात येते. मुख्यमंत्र्यांनी ही गाडी चालवल्यानंतर या गाडीची सध्या सर्वत्र जोरदार चर्चा रंगली आहे.

महत्वाच्या बातम्या-

Join WhatsApp Group

Join Now