बिग बाॅस विजेत्याला मिळणार तब्बल ‘इतके’ रूपये

On: December 24, 2022 4:36 PM
---Advertisement---

मुंबई | बिग बाॅस(Bigg Boss) हा सर्वात लोकप्रिय असलेल्या शो पैकी एक आहे. त्यातच बिग बाॅस मराठी सीझन 4 चे (Bigg Boss Marathi 4) ग्रॅंड फिनाले(Grand Finale) आता जवळ आलं आहे. त्यामुळं या सीझनचा विजेता कोण ठरणार याकडं सर्वांचं लक्ष लागलं आहे.

सध्या बिग बाॅसच्या घरात अक्षय केळकर, अपूर्वा नेमळेकर, राखी सावंत, प्रसाद जावदे, किरण माने, अरोह वेलणकर आणि अमृता धोंगडे हे सदस्य राहिले आहेत.

बिग बाॅसचा ग्रॅंड फिनाले नवीन वर्षात म्हणजेत 10 जानेवारीला सायंकाळी 7 वाजता होण्याची शक्यता आहे. परंतु कलर्स मराठीकडून अजून याबाबत कोणतीही घोषणा करण्यात आली नाही.

या सीझनच्या विजेत्याला तब्बल 25 लाखांचं बक्षिस मिळणार होतं. परंतु कॅप्टन्सी कार्यक्रमाच्या वेळी यातील निम्मी रक्कम कमी झाली आहे.

या सीझनच्या विजेत्याला 8 लाख रूपये आणि ट्राॅफी मिळणार आहे, अशा चर्चा आहेत. जर ही रक्कम खरी असेल तर बिग बाॅसच्या इतिहासातील विजेत्याला मिळालेली ही सर्वात कमी रक्कम असणार आहे.

महत्वाच्या बातम्या-

Join WhatsApp Group

Join Now