बायकोचं डोकं वरवंट्यानं ठेचलं, अन् स्वतः… कारण धक्कादायक…

On: September 13, 2023 7:11 PM
---Advertisement---

नाशिक | पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत पतीने तिचा निर्दयीपणे खून (Murder) केल्याची घटना नाशिकमध्ये (Nashik) घडलीये. या घटनेने संपूर्ण नाशिक शहर हादरलंय. मुंबई आग्रा महामार्गावर असलेल्या आडगाव गावात ही घटना घडली आहे. एका व्यक्तीने पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत झोपेत असतानाच तिच्या डोक्यात दगडी वरवंटा टाकून ठार मारल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

आडगाव पोलिसांनी दिलेली माहिती अशी, बुधवारी मध्यरात्री संशयित विशाल निवृत्ती घोरपडे याच्या डोक्यात बायकोच्या चारित्र्याच्या संशयाचं भूत शिरलं आणि त्याने शेवटी बायको धनश्री उर्फ प्रिती विशाल घोरपडे हीला संपवलं आणि स्वत:ही आत्महत्या केली. विशाल मखमलाबाद परिसरात असलेल्या एका मार्बल दुकानात मोलमजुरी व्यवसाय करायचा तर पत्नी धुणीभांडी काम करायची

हा सगळा प्रकार बुधवारी सकाळी उघडकीस आला. घोरपडे दाम्पत्य भाडेतत्वावर येथील एका खोलीत राहत होते. पोलिसांनी खोलीचे मालक गणपत घोगरे यांच्यासह पत्नीला आणि मुलाला चौकशीसाठी ताब्यात घेतलं आहे.

दरम्यान, गेल्या काही महिन्यांपासून पती पत्नी हे दोघेही एकत्र राहत असताना धनश्रीचे परिसरातील एका युवकाशी अनैतिक संबंध असल्याचा संशय विशालला आला होता. त्यावरून दोघा पती पत्नीत या कारणावरून शाब्दिक वादही झाले होते.

महत्त्वाच्या बातम्या-

Babita Durande

Babita Durande

Join WhatsApp Group

Join Now