Manoj Jarange | सरकारने काढलेल्या अध्यादेशाला 9 फेब्रुवारीला पंधरा दिवस पूर्ण होणार आहे. त्यामुळे या अध्यादेशाची अंमलबजावणी न झाल्यास 10 फेब्रुवारीपासून पुन्हा एकदा आमरण उपोषण सुरू करणार असल्याचा इशारा जरांगेंनी दिला आहे. यामुळे सरकारचं टेंशन वाढलं आहे.
‘आंदोलन सुरूच राहणार’; पुन्हा केली मोठी घोषणा
आमचं आंदोलन अजूनही संपलेलं नाही. जोपर्यंत सरकारने काढलेल्या अध्यादेशाचा लाभ मराठा समाजाला होणार नाही, तोपर्यंत आंदोलन सुरूच राहणार असल्याचं मनोज जरांगे (Manoj Jarange) म्हणाले आहेत.
सराकारला एकच व्यक्ती हवा आहे. करोडो मराठे नको असतील, तर मी आंदोलनावर का बसू नयेत. आम्ही 16 फेब्रुवारीपर्यंत काहीच बोलणार नव्हतो. पण, सरकारमधील दोन भुमिका पुढे येवू लागल्याने 10 फेब्रुवारीलाच आंदोलन सुरु करणार आहे. एकीकडे सरकारच्या शिष्टमंडळाकडून अध्यादेश दिला जातो, आणि दुसरीकडे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दिल्लीत जाणार आहेत. सरकारमध्येच दोन भूमिका पाहायला मिळत आहे. त्यामुळे संशय येत आहे, असं मनोज जरांगे म्हणालेत.
Manoj Jarange | “गुलालाचा अपमान झाल्यास सरकारला जड जाईल”
मी 10 तारखेला उपोषणाला बसणार असून, मागे हटणार नाही. गुलालाचा अपमान झाल्यास सरकारला जड जाईल. शिंदे समिती मराठवाड्यामध्ये काम करीत नाही. मराठवाड्यात नोंदी सापडत नाहीत. खालचे अधिकारी ऐकत नाहीत. विभागीय आयुक्तांनी सांगितल्यावर खाली हालचाल होते, असंही ते म्हणालेत.
सरकारची समिती काम करीत नाही. कुणाच्या दबावाखाली काम करू नका. सगेसोयऱ्यांना उद्यापासून प्रमाणपत्र देण्यात यावेत. अर्ज दाखल करून देखील प्रमाणपत्र मिळत नाही. हैदराबाद गॅझेट देऊन चार दिवस झाले, मात्र अजूनही तो स्वीकारला नाही. राजपत्रीत अध्यादेश दिला असून, तो टिकवणे सरकारची जबाबदारी आहे. सरकारमध्येच दोन भुमिका दिसत आहेत, असं जरांगेंनी सांगितलं.
सरकारमध्येच अर्धे विरोधात आणि अर्धे पाठींबा देतांना पाहायला मिळत आहे. सरकारमधून दोन भुमिका येत असल्याने मी अमरण उपोषणावर बसणार आहे, असं त्यांनी सांगितलंय.
महत्त्वाच्या बातम्या-
Ashok Saraf | मोठी बातमी! अशोक सराफ यांना ‘महाराष्ट्र भूषण’ जाहीर
Health Insurance असेल तर ही बातमी नक्की वाचा, आता होईल फायदाच फायदा
Jaya Bachchan | 50 वर्षांच्या संसारानंतर जया बच्चन यांचा मोठा खुलासा, म्हणाल्या “लग्नानंतर…”
Hrithik Roshan | अभिनेता हृतिक रोशनने केली सर्वांत मोठी घोषणा!
Rule Change | 1 फेब्रुवारीपासून ‘हे’ नियम बदलणार; तुमच्या खिशावर होणार परिणाम






