मराठा समाजामुळे नरेंद्र मोदी आणि विखेंचं टेन्शन वाढलं!

On: October 25, 2023 8:07 PM
narendra modi
---Advertisement---

अहमदनगर | पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांचा उद्या शिर्डी (Shirdi) दौरा पार पडणार आहे. त्याठिकाणी अनेक कार्यक्रमांचं ते उद्घाटन करणार असल्याचं माध्यमांच्या माहितीनुसार समोर आलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा शिर्डी येथे हा दुसरा दौरा आहे. मोदींच्या कार्यक्रमासाठी लाखो लोक उपस्थित राहणार आहेत. त्यासाठी तिथे जय्यत तयारी करण्यात आली आहे.

नरेंद्र मोदी यांच्या कार्यक्रमादिवशी महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrushna Vikhe Patil) आणि खासदार डॉ. सुजय विखे पाटील (Dr. Sujay Vikhe Patil) यांचे शक्तिप्रदर्शन होणार असून मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा समाज आक्रमक झाल्याने प्रशासनापुढे चिंता निर्माण झाली आहे. यावेळी मोदींच्या सभेत संभाजी ब्रिगेड (Sambhaji Brigade) आणि शिवसेना (ठाकरे गट) (Shivsena UBT) कार्यकर्ते मराठा आरक्षणाविषयीची भूमिका विचारतील.

सुरुवातीला मोदी यांच्या सभेत ऐकूण 5 हजार कार्यकर्ते आधी जाऊन बसतील आणि जर मोदी यांनी आरक्षणाबाबात काही भूमिका मांडली नाही तर मात्र सर्वजण एकाच वेळी उभे राहून जाब विचारतील, अशी योजना असल्याचं माध्यमांच्या माहितीनुसार समोर आलं.

थोडक्यात बातम्या-

 

Mrudula Jog

Mrudula Jog

Join WhatsApp Group

Join Now