बाबो! सिद्धार्थनं कियारासाठी केलंय तब्बल ‘इतक्या’ कोटींचं मंगळसूत्र

On: February 11, 2023 2:14 PM
---Advertisement---

मुंबई | बाॅलिवूड(Bollywood) अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा(Sidharth Malhotra) आणि अभिनेत्री कियारा अडवाणीनं(Kiara Advani) नुकतीच लग्नगाठ बांधली आहे. सध्या त्यांच्या लग्नाचे फोटो, व्हिडीओ सोशल मीडियावर तूफान व्हायरल होत आहेत.

सिद्धार्थ-कियारानं जैसलमेरमधील सुर्यगढ पॅलेसमध्ये सात फेरे घेतले. या सुर्यगढचे दिवसाचे भाडे २ कोटी रूपये आहे, असं म्हटलं जात आहे. सिद्धार्थ-कियारानं तर हा पॅलेस तीन दिवसांसाठी बुकींग केला होता.

सिद्धार्थ-कियाराचं लग्न हे महागड्या लग्नांपैकी एक ठरत आहे. कारण सिद्धार्थनं लग्नात घातलेली शेरवानी आणि कियारानं घातलेले दागिनेही अत्यंत महागडे होते.

या सगळ्यात आता कियाराचं मंगळसूत्रही जोरदार चर्चेत आहे. कियाराचं मंगळसूत्र प्रसिद्ध डिझायनर सब्यसाचीने डिझाईन केले आहे. सोन्याच्या चेनमध्य काळे मणी आणि मध्ये डायमंड अशी या मंगळसूत्राची डिझाईन आहे.

या मंगळसूत्राची किंमत तब्बल २ कोटी रूपये आहे. सिद्धार्थनं लाडक्या बायकोसाठी केलेल्या या मंगळसूत्राची सध्या सर्वत्र जोरदार चर्चा होत आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

Join WhatsApp Group

Join Now