सभागृहात मुख्यमंत्र्यांच्या गैरहजेरीवर फडणवीसांचं उत्तर ऐकून विरोधकांना हसू आवरेना

On: December 27, 2022 1:13 PM
Devendra fadnavis
---Advertisement---

मुंबई | नागपूरात हिवाळी अधिवेशन सुरू आहे. मंगळवारी अधिवेशनाचा सहावा दिवस आहे. या अधिवेशनात विरोधकांनी महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नाच्या मुद्द्यावरून सत्ताधाऱ्यांची चांगलीच कोंडी केली आहे.

त्यातच सोमवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर(Eknath Shinde) विरोधकांनी गंभीर आरोप केले आहेत. परंतु मंगळवारी लगेचच मुख्यमंत्री प्रश्नोत्तराच्या तासाला गैरहजर राहिल्यानं विरोधकांनी हा मुद्दा चांगलाच लावून धरला आहे.

विरोधी पक्षनेते अजित पवार(Ajit Pawar) यांनी शिंदेंच्या गैरहजेरीवर आक्षेप घेतला आहे. याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री कुठं आहेत?, अशी विचारणा पवारांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस(Devendra Fadnvis) यांच्याकडं केली. यावर फडणवीसांनी दिलेलं उत्तर ऐकून सभागृहात काहींना हसू आले.

पवारांच्या प्रश्नावर उत्तर देताना फडणवीस म्हणाले की, तुम्ही सभागृह चालू देणार आहे हे आम्हाला माहित नव्हतं,नाहीतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सभागृहात उपस्थित राहीले असते.

फडणवीसांनी दिलेल्या उत्तरावर पुन्हा पवारांनी फडणवीसांना उत्तर दिले. पवार म्हणाले, आम्ही सभागृह चालू देणार नाही, हे तुम्हाला माहित होतं मग तुम्ही कसं आले?, यानंतर सभागृहात विरोधकांना हसू आवरेना झालं.

महत्वाच्या बातम्या-

Join WhatsApp Group

Join Now