मोठी बातमी! पुण्यातील ‘या’ तालुक्याचं नाव बदललं

On: March 13, 2024 4:16 PM
Pune News
---Advertisement---

Pune News | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या अध्यक्षतेखाली आज राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीत तब्बल 26 निर्णय घेण्यात आले आहेत. यात एक अत्यंत महत्त्वाचा निर्णय घेण्यात आलाय. पुणे जिल्ह्यातील (Pune News) वेल्हे तालुक्याला आता राजगड म्हणून नामांतर करण्यात आलं.

मंत्रिमंडळ बैठकीत मोठा निर्णय

वेल्हे तालुक्यातल्या ज्या राजगड किल्ल्यावरुन छत्रपती शिवाजी महाराजांनी 27 वर्षे स्वराज्याचा कारभार केला, त्या ऐतिहासिक राजगड किल्ल्याचे, स्वराज्याच्या पहिल्या राजधानीचे नाव वेल्हे तालुक्याला देण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या माध्यमातून आज घेण्यात आलाय.

‘या’ तालुक्याचं नाव बदललं

दरम्यान, अहमदनगर शहराचे नाव ‘अहिल्यानगर’ करण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाने घेतलेला आहे. तसेच वेल्हे तालुक्याचे नाव ‘राजगड’ करण्याच्या मंत्रिमंडळाचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला आहे.

वेल्हे तालुका आणि पुणे जिल्हावासियांची इच्छा पूर्ण करता आली, याचा मनापासून आनंद आहे, अशी प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केली आहे

मागील वर्षी औरंगाबादचं नाव छत्रपती संभाजीनगर आणि उस्मानाबादचं धाराशीव नामांतर केल्यानंतर शिंदे फडणवीस सरकारने अहमनदगरच्या नामांतरची घोषणा केली होती.

अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीचं औचित्य साधून अहमदनगरचे नामांतर ‘अहिल्यादेवीनगर’ करण्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली होती. जामखेडच्या चौंडी येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीच्या कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आले असता नामांतराची घोषणा करण्यात आली होती. अखेर आजच्या बैठकीत याबाबत निर्णय घेण्यात आला आहे.

महत्त्वाच्या बातम्या- 

‘या’ बड्या अभिनेत्यांचा CAA ला कडाडून विरोध; भाजपला चांगलंच झापलं

यश मिळवायचं असेल तर ‘या’ 3 गोष्टी नक्की करा

शरद पवार भाजपला मोठा धक्का देण्याच्या तयारीत!

हरियाणात नाट्यमय घडामोडी; मोठी अपडेट समोर

अभिनेत्री करिश्मा कपूरचा सर्वांत मोठा खुलासा, म्हणाली…

 

Babita Durande

Babita Durande

Join WhatsApp Group

Join Now