मुंबई | ललित पाटील (Lalit Patil) ड्रग्स प्रकरणात सर्व बाजूने पोलिसांनी कारवाई सुरु केली आहे. ललित पाटील याला अटक केल्यानंतर त्यांना मदत करणारे सर्वच रडारवर आले आहेत. आता ललित पाटील त्याला मदत करणाऱ्यांची नावे चौकशीत देणार आहे. अशात या प्रकरणी आता काँग्रेस आमदाराने केलेल्या आरोपाने खळबळ माजली आहे.
काँग्रेस आमदार रवींद्र धंगेकर यांनी ससूनचे डीन डॉक्टर संजीव ठाकूर यांना भाजपचा (Bjp) एक मंत्री फोन करत होता. त्यामुळे ललित पाटील याला पंचतारांकीत सुविधा मिळाली. या प्रकरणात ललित पाटील याच्याबरोबर संजीव ठाकूर यांनाही सहआरोपी करावे, अशी मागणी रवींद्र धंगेकर यांनी केली.
ललित पाटीलसोबत ससूनचे डीन संजीव ठाकूर यांची नार्को टेस्ट करा. यानंतर सर्वांची नावे समोर येतील सगळ्यांना सत्य काय आहे समजेल, असं रवींद्र धंगेकर म्हणालेत. ते पुण्यात माध्यमांशी बोत होते. यावेळी त्यांनी थेट या प्रकरणात भाजपच्या मंत्र्याचा हात असल्याचा आरोप केलाय.
ललित पाटील याला ससून रुग्णालयामध्ये ठेवण्यासाठी एक मंत्री ससून रुग्णालयाचे अधिष्ठाता संजीव ठाकूर यांना फोन करत होता. या मंत्र्याचे गुन्हेगारी विश्वात चांगले संबंध आहेत. गुन्हेगारांसोबत तो मंत्री वावरताना दिसतो. गुन्हेगारी विश्वात तो काम करत असतो. निवडणूक जिंकण्यासाठी तो गुन्हेगारांची मदत घेतो. ललित पाटील आणि त्याचे संबंध सर्वांना माहितीये, असं धंगेकर म्हणालेत.
ठाकूर यांनी ललित पाटील याच्याकडून प्रचंड पैसे घेतले आहे. सोलापूरमध्ये 15 कोटींचा भ्रष्टाचार संजीव ठाकूर यांनी केला होता. त्यानंतर त्यांची बदली झाली, असा आरोप आमदार रवींद्र धंगेकर यांनी केला.
ललित पाटील याला मोकोका लावण्यात आला आहे. त्याचबरोबर संजीव ठाकूर यांना सहआरोपी करून त्यांच्यावरही मोकोका लावा, असे रवींद्र धंगेकर यांनी म्हटलंय.
महत्त्वाच्या बातम्या-
मराठा समाजासाठी सर्वात मोठी गुड न्यूज!
“बाजारात चार आणे आणि राजकारणात राणे यांना आता कवडीची किंमत नाही”






