लोकशाहीवर भाषण ठोकणाऱ्या भुऱ्यासाठी सरकारची मोठी घोषणा!

On: February 21, 2023 6:41 PM
---Advertisement---

मुंबई | सोशल मीडियामुळे (Social media) हल्ली अनेकांचं जीवन सुखकर झालं आहे. सोशल मिडियामुळं अनेकदा अनेकांची मदत करता येते. पैसे कमवता येतात. हल्ली तसंच काहीसं झालं असल्याचं दिसून येत आहे. प्रजासत्ताक दिनादिवशी (Republic Day) एका लहान चिमुकल्यानं केलेलं भाषण सध्या व्हायरल झालं होतं.

यानतंर त्या चिमुकल्याचं सर्व सत्तरातून कौतुक करण्यात आलं होतं. हा व्हिडीओ एका अकाऊंटवरुन ट्विट करण्यात आला होता. व्हिडीओत दिसणारा विद्यार्थी किंवा शाळा कोणती हे अद्याप समोर आलेलं नव्हतं. मात्र काही वृत्तवाहिन्यांनी याची दखल घेऊन त्या मुलाची माहिती काढली होती.

खुद्द मुख्यमंत्र्यांनी (eknath shinde) त्या मुलाची भेट घेतली होती. अनेक राजकीय पक्षांनी त्याची भेट घेऊन त्याचं कौतुक केलं होतं. त्यादरम्यान त्या मुलाला दृष्टिदोष असल्याचं कळलं होतं. त्यामुळे याच माध्यमातून त्या मुलाला मदत करण्याचं आवाहन त्याच्या आई-वडिलांनी केलं होतं.

यानंतर आता त्या मुलाला मदतीचे हात मिळाले असून त्याच्यावर उपचार करण्यात येणार आहेत. मंगळवारी मुबंईतील जे.जे रुग्णालयात प्रसिद्ध नेत्र तज्ञ डाॅक्टर तात्याराव लहाने (TatyaRao Lahane) यांनी कार्तिकच्या डोळ्यांची तपासणी केली आहे.

दरम्यान, या मुलाचं नाव कार्तिक वजीर आहे. उपचारासाठी त्याला मुख्यमंत्री सहाय्यता निधीच्या माध्यमातून आणि समृद्धी साखर कारखान्याचं चेअरमन सतिष घाटगे पाटील (Satish Ghatge Patil) यांच्या मदतीतून करण्यात येणार आहे. समृद्धी साखर कारखान्याच्या वतीनं कार्तिकच्या शिक्षणाचा देखील खर्च करण्यात येणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Join WhatsApp Group

Join Now