मंत्रिमंडळ बैठकीत सरकारने घेतला आणखी एक मोठा निर्णय!

On: November 17, 2023 8:10 PM
---Advertisement---

मुंबई | दिवाळीनंतर सर्वजण पुन्हा एकदा कामकाजाला लागले आहेत. याच पार्श्वभूमीवर आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली राज्यातील मंत्रीमंडळाची बैठक पार पडली. यावेळी सरकारने राज्यातील जनतेसाठी महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.

सरकारने कोणता निर्णय घेतला?

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज बैठक घेतली. यावेळी सरकारने जनतेसाठी एक मोठा निर्णय घेतला. बैठकीत बोलत असताना  मंगरूळपीर येथील सत्तर सावंगी बॅरेजला मान्यता देण्यात आली आहे. त्यामुळे आता 1345 हेक्टर क्षेत्र सिंचित होणार आहे, अशी माहिती समोर आली आहे.

याशिवाय, राज्यातल्या ग्रामपंचायत इमारतीच्या कामांसाठी निधी वाढवण्याचा देखील निर्णय घेण्यात आला आहे. ग्रामविकास विभागातून आणखी एक मोठा निर्णय घेण्यात आला आहे. बाळासाहेब ठाकरे स्मृती मातोश्री ग्रामपंचायत योजनेलाही मुदतवाढ देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

राज्य मंत्रिमंडळात उच्च आणि तंत्रशिक्षण विभागासासाठी देखील मोठा निर्णय घेण्यात आला. आता शिक्षण संस्था समूह विद्यापीठे स्थापन करू शकणार आहे. याबाबतच्या मार्गदर्शक तत्त्वांना मान्यता देण्यात आली आहे.

राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत आज राज्य आर्थिक सल्लागार परिषदेच्या अहवालाचे सादरीकरण करण्यात आलं. 1 ट्रिलियन डॉलर्स अर्थव्यवस्थेचे ध्येय गाठण्यासाठी विविध 341 शिफारशी करण्यात आल्या आहेत. दरम्यान ओबीसी नेत्यांची जालन्यात मोठी सभा पार पडली. या सभेत मंत्री छगन भुजबळ यांनी मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांच्यावर सडकून टीका केली. पण मंत्रिमंडळाच्या बैठकीत आरक्षणाबाबत काही चर्चा झाल्याची माहिती समोर आलेली नाही.

थोडक्यात बातम्या- 

वर्ल्डकप फायनलआधी राज ठाकरेंचं सर्वात मोठं वक्तव्य!

‘महाराष्ट्र तुमच्या सातबाऱ्यावर लिहून दिला काय?’, भुजबळ मराठ्यांवर संतापले 

‘तुझं खातोय का रे…’; छगन भुजबळांचा जरांगेंवर हल्लाबोल

शरद पवारांचा मोठा दावा, ‘या’ बड्या नेत्याचं टेंशन वाढलं

अजित पवार गोविंदबागेतल्या दिवाळीसाठी का आले नाहीत?, सुप्रिया सुळेंनी सांगितलं कारण

Mrudula Jog

Mrudula Jog

Join WhatsApp Group

Join Now