सर्वात मोठी बातमी; कोरोनाची चौथी लाट येणार?

On: December 22, 2022 11:09 AM
---Advertisement---

मुंबई | चीनमध्ये कोरोनाच्या (Corona) संसर्गाने हाहाकार उडवला आहे. भारतातही (India) कोरोनाचा संसर्ग वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने राज्यांना सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या आहेत.

देशात चार रुग्ण (Patient) आहेत. महाराष्ट्रातही एकही रुग्ण नाही. घाबरून जाण्याचे कारण नाही. राज्यात रुग्ण आढळला नसला तरी आरोग्य विभागांना लसीकरण, डॉक्टर आणि औषधा संदर्भात सूचना देण्यात आल्या आहेत.

तालुका केंद्रापासून ते महानगर पालिकेतील सर्व आरोग्य यंत्रणेला खबरदारी घेण्याच्या आणि सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या आहेत. आरोग्य भरती करण्यावरही आमचा भर आहे, असंही आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी सांगितलं आहे.

कोरोनाचे निर्बंध अद्याप कोठेही लावण्यात येणार नसून राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनानुसार पुढील आवश्यक ते निर्णय घेण्यात येणार असल्याचं सावंत यांनी सांगितलं आहे.

जगभरात पुन्हा एकदा कोरोना व्हायरसची दहशत पसरली आहे. त्यामुळे तातडीने खबरदारी घेण्यासाठी सरकारने तयारी सुरू केली आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

Babita Durande

Babita Durande

Join WhatsApp Group

Join Now