Thane Loksabha | शिंदेंचा बालेकिल्ला असलेल्या ठाण्यात (Thane Loksabha 2024) नेमकं काय होणार याबाबत शंका होती. गेली अनेक दिवसांपासून ठाणे लोकसभा (Thane Loksabha 2024) मतदरसंघातून एकनाथ शिंदे आणि महायुती उमेदवाराचं नाव घोषित करत नव्हते. याचा अर्थ ही जागा देखील राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसच घेणार का? अशा चर्चा रंगल्या होत्या. मात्र आता चर्चेला पूर्णविराम मिळाला आहे. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्याच उमेदवाराला संधी दिली आहे.
नरेश म्हस्केंना उमेदवारी जाहीर
एकनाथ शिंदे यांचे निकटवर्तीय नरेश म्हस्के यांना ठाणे लोकसभा (Thane Loksabha 2024) मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आलीये. तर कल्याण लोकसभा मतदारसंघातून कल्याणचे खासदार श्रीकांत शिंदे यांना पुन्हा एकदा अधिकृत उमेदवारी देण्यात आलीये. शिवसेना शिंदे गटाकडून काल उत्तर पश्चिम मुंबई आणि दक्षिण मुंबईचे उमेदवार जाहीर करण्यात आले होते. त्या जागेवर शिंदे गटाच्या नेत्यांना संधी देण्यात आली.
एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यापासून नरेश म्हस्के हे नेहमीच एकनाथ शिंदेंसोबत आहेत. ठाण्याची जागा ही महायुतीकडे होती. मात्र त्यातूनही महायुतीतल्या कोणत्या पक्षाकडे ही उमेदवारी जाईल याबाबत प्रश्न उपस्थित होत होते.
कल्याणमधून श्रीकांत शिंदेंना उमेदवारी जाहीर
कल्याण लोकसभा मतदारसंघ आणि ठाणे लोकसभा (Thane Loksabha 2024) मतदारसंघ या दोन्ही जागा मिळवण्यात शिंदेंना यश मिळालं आहे. एकनाथ शिंदे यांचा बालेकिल्ला असलेल्या कल्याण आणि ठाणे लोकसभा मतदारसंघात भाजपने दावा केला. यामुळे शिंदेंचे दोन बालेकिल्ले भाजपच्या खिश्यात जाणार असल्याच्या चर्चा होत्या. मात्र एकनाथ शिंदे यांनी दोन्ही लोकसभा मतदारसंघात लक्ष घातलं आणि दोन्ही मतदारसंघ आपल्या बाजूने वळवण्याकडे ते यशस्वी ठरलेत.
ठाणे लोकसभा मतदारसंघाकडून प्रताप सरनाईक यांचं नाव देखील चर्चेत होतं. ते ओवळा-माजीपाडा विधानसभा मतदारसंघाचे मतदारसंघाचे आमदार आहेत. मुख्यमंत्र्यांचे समर्थक आहेत. उमेदवारीसाठी सरनाईक यांचं देखील नाव चर्चेत होतं. मात्र अंतिम स्थितीत नरेश म्हस्के यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली. नरेश म्हस्के हे एकनाथ शिंदे यांचे विश्वासू आहेत. ते ठाणे महापौर म्हणून देखील निवडून आले होते. 2012 पासून ते ठाणे महापालिकेवर सातत्याने निवडून गेले आहेत.
ठाणे – म्हस्के विरूद्ध विचारे, कल्याण – दरेकर विरूद्ध शिंदे
कल्याणमधून उद्धव ठाकरे गटाच्या महायुतीच्या उमेदवार वैशाली दरेकर यांना उमेदवारी देण्यात आलीये. तर त्यांच्याविरोधात ठाण्याचा बालेकिल्ला राखणारे एकनाथ शिंदे यांचे पुत्र श्रीकांत शिंदे यांना उमेदवारी देण्यात आलीये. तर ठाणे येथे एकनाथ शिंदे यांच्या गटातून नरेश म्हस्के आणि उद्धव ठाकरे गटातून राजन विचारे ठाणे लोकसभा मतदारसंघात निवडणूक लढणार आहेत.
लोकसभा निवडणूक – २०२४ साठी कल्याण लोकसभा मतदारसंघातून श्री. श्रीकांत एकनाथ शिंदे आणि ठाणे लोकसभा मतदारसंघातून श्री. नरेश गणपत म्हस्के यांचे शिवसेनेचे अधिकृत उमेदवार म्हणून नाव घोषित करण्यात आले आहे. त्यांना लोकसभा निवडणुकीसाठी हार्दिक शुभेच्छा !#Shivsena #LokasabhaElection2024 pic.twitter.com/XYJjTUy0r8
— Shivsena – शिवसेना (@Shivsenaofc) May 1, 2024
News Title – Thane Loksabha And Kalyan Loksabha in Shinde Group Announced Official Candidate
महत्त्वाच्या बातम्या
महिन्याच्या पहिल्याच दिवशी ग्राहकांना दिलासा; सोने-चांदीच्या दरात मोठी घसरण
“मी जिवंत आहे तोपर्यंत मुस्लिमांना..”; पंतप्रधान मोदींचं मोठं वक्तव्य
पीएफ खात्यात पैसे जमा झाले की नाही?, कसं तपासणार?; जाणून घ्या सविस्तर
‘या’ भागांत सूर्य आग ओकणार! हवामान विभागाकडून उष्णतेचा यलो अलर्ट
‘या’ राशीच्या लोकांचं भाग्य उजळणार, नव्या संधी आयुष्य बदलतील






