ठाणे-कल्याण डोंबिवलीकरांनो लक्ष द्या! ‘या’ २ दिवशी पाणीपुरवठा बंद राहणार

On: November 8, 2025 4:52 PM
Thane water cut
---Advertisement---

Thane water cut | ठाणे आणि कल्याण-डोंबिवलीकरांसाठी मोठी बातमी समोर आली आहे. आगामी काही दिवसांत ठाणे महानगरपालिका आणि कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या मर्यादेत पाणी पुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे. त्यामुळे नागरिकांनी या काळात पाण्याचा काटकसरीने वापर करावा, असे आवाहन दोन्ही महापालिकांकडून करण्यात आले आहे. (Thane water cut)

ठाण्यातील काही भागांमध्ये सोमवार, 10 नोव्हेंबर 2025 रोजी सकाळी 9 वाजल्यापासून मंगळवार, 11 नोव्हेंबर रोजी सकाळी 9 वाजेपर्यंत 24 तासांसाठी पाणीपुरवठा बंद राहील. तर कल्याण-डोंबिवलीत मंगळवारी सकाळी 9 ते रात्री 9 या 12 तासांच्या कालावधीत पाणी पुरवठा बंद राहणार आहे.

ठाण्यातील पाणीपुरवठा का होणार बंद? :

ठाणे महानगरपालिकेच्या उथळसर प्रभाग समिती अंतर्गत सिद्धेश्वर जलकुंभाजवळ नवीन जलकुंभाचे बांधकाम सुरु करण्यात आले आहे. या कामामुळे कोलबाड परिसराला पाणीपुरवठा करणारी मुख्य वाहिनी बाधित होत असल्याने ती स्थलांतरित करणे आवश्यक झाले आहे. या कारणामुळे सोमवार, 10 नोव्हेंबरपासून 24 तास पाणीपुरवठा थांबविण्यात येईल.

या काळात उथळसर प्रभागातील सिद्धेश्वर तलाव, माता रमाबाई आंबेडकर नगर, गणेश वाडी, नितीन कंपनी, पाचपाखाडी, हंस नगर, खोपट, फ्लॉवर व्हॅली, शेलार पाडा, गोकुळदास वाडी, कोलबाड आणि नौपाडा प्रभागातील चरई, धोबीआळी, महापालिका मुख्यालय परिसर, चंदनवाडी या भागात पाणी पुरवठा पूर्णपणे बंद राहील.

Thane water cut | कल्याण-डोंबिवलीत 12 तास पाणी कपात :

कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या मोहिली जलशुद्धीकरण केंद्रातील यांत्रिक व विद्युत उपकरणांच्या दुरुस्तीची कामे करण्यात येणार आहेत. तसेच “अ” प्रभाग क्षेत्रातील मांडा-टिटवाळा परिसरामध्ये पाणी वितरण व्यवस्थेतील जलवाहिन्यांची देखभालही केली जाणार आहे. (Thane water cut)

या कामासाठी मंगळवार, 11 नोव्हेंबर 2025 रोजी सकाळी 9 ते रात्री 9 वाजेपर्यंत 12 तास पाणीपुरवठा बंद राहील. या दरम्यान कल्याण पूर्व-पश्चिम विभागातील काही भाग तसेच कल्याण ग्रामीण परिसरातील मांडा-टिटवाळा, वडवली, आंबिवली, शहाड, अटाळी आणि अन्य गावांमध्ये पाणीपुरवठा होणार नाही.

महापालिकेकडून नागरिकांना या कालावधीत पाण्याचा साठा करून ठेवण्याचे आणि पाण्याचा वापर काटकसरीने करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. तसेच दुरुस्तीची कामे पूर्ण झाल्यानंतर पुढील 1-2 दिवस पाणी कमी दाबाने येण्याची शक्यता असल्याचेही सांगण्यात आले आहे.

News Title: Thane and Kalyan Dombivli Water Cut: 24-hour shutdown in Thane, 12-hour water cut in Kalyan-Dombivli on November 10-11

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now