ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारेंना मोठा धक्का!

On: October 22, 2023 5:03 PM
---Advertisement---

सातारा | ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे (Sushma Andhare) अडचणीत आल्या आहेत. मंत्री शंभूराज देसाई (Shambhuraj Desai) यांची बदनामी केल्याप्रकरणी सुषमा अंधारे यांच्याविरोधात पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली आहे. सातारा जिल्ह्यातील सर्वपक्षी- सर्व जातीय आणि सर्वधर्मीय यांनी अंधारे विरोधात तक्रार दाखल केलीये.

नेमकं प्रकरण काय?

ललिल पाटील प्रकरणाचा तपास करायला हवा. या प्रकरणात राजकीय लोक आहेत. दादा भुसे, शंभुराज देसाई यांची नार्को टेस्ट करा, अशी मागणी अंधारे यांनी केली होती. यानंतर ललित पाटील प्रकरणात सुषमा अंधारे यांनी केलेले सर्व आरोप उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाईंनी फेटाळून लावले.

अंधारेंनी आपलं वक्तव्य 24 तासांत मागे घ्यावे अन्यथा कायदेशीर प्रक्रियेला सामोरे जावे, असा इशारा देसाई यांनी अंधारेंना दिला होता.

महत्त्वाच्या बातम्या-

Join WhatsApp Group

Join Now