ठाकरे अन् भाजपचे कार्यकर्ते एकमेकांशी भिडले, भांडणाचा व्हिडीओ व्हायरल

On: February 10, 2023 6:12 PM
---Advertisement---

हिंगोली | हिंगोलीती औंढा नागनाथ (Aundha nagnath) येथील एका बँकेच्या उपाध्यक्ष पदाच्या निवडीवरून ठाकरे (Thackeray) विरुद्ध भाजपच्या (Bjp) कार्यकर्त्यांमध्ये धुसफूस होती. ही धुसफूस अखेर वाद आणि हाणामारीच्या रुपातून बाहेर आली आहे.

सोशल मीडियावर या हाणामारीचा व्हिडीओ सध्या मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. यानंतर जिल्ह्यातील वातावरण तापल्याचं पाहायला मिळतंय.

डॉ. जयप्रकाश मुंदडा यांच्या पुतण्याला उपाध्यक्ष पद देण्यावरून हा वाद सुरु झाला. अध्यक्ष पदाच्या निवडीची प्रक्रिया सुरु होती. अधिकारी सहाय्यक निबंधक मुकुंद देशमुख यांच्यासमोर राजाभाऊ मुसळे, गोपाल अग्रवाल, अंकुश आहेर आदी मंडळी बसली होती.

अचानक तेथे बँकेचे संचालक दीपक मुंदडा हे कार्यकर्त्यांना घेऊन आले. उपाध्यक्ष पद निवडीवरून या वादाला सुरुवात झाली. केबिनमध्ये घुसल्यानंतर वाद आणि धक्काबुक्की सुरु झाली. हा वाद वाढतच गेला. नंतर याचं मारामारीत रूपांतर झालं.

महत्त्वाच्या बातम्या-

Babita Durande

Babita Durande

Join WhatsApp Group

Join Now