Tejashri Pradhan | मराठी टीव्ही विश्वातील प्रसिद्ध आणि लोकप्रिय अभिनेत्री तेजश्री प्रधान कायम तिच्या प्रोफेशनल आणि खासगी आयुष्यामुळे चर्चेत असते. ‘होणार सून मी ह्या घरची’ मालिकेत मुख्य भूमिका साकारत असताना तेजश्रीने अभिनेता शशांक केतकर याच्यासोबत लग्न केले होते. पण, दोघांचे नाते फार काळ टिकले नाही. अखेर त्यांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला. घटस्फोटानंतर शशांकने दुसरे लग्न करून संसार थाटला. नुकत्याच झालेल्या एका मुलाखतीत तेजश्रीने घटस्फोटावर मोठे वक्तव्य केले आहे.
घटस्फोटानंतर पहिल्यांदाच बोलली तेजश्री :
तेजश्री म्हणाली (Tejashri Pradhan) “जेव्हा अशी परिस्थिती तुमच्या आयुष्यात येणार असेल तेव्हा दैवत ते बळ आपल्याला देते. जेव्हा तुम्हाला वाटते काहीतरी चुकीचे होत आहे, तेव्हा ते बळ येते आणि निर्णय घेतला जातो. आज विचार केल्यानंतर मला त्या गोष्टी फार कठीण वाटतात. पण जेव्हा कठीण परिस्थिती समोर येते तेव्हा ते बळ आपल्यात येते आणि गोष्टी मार्गी लागल्यानंतर ते बळ आपल्यातून निघून जाते. मला असे वाटते दोन चांगली माणसं दोन चांगले लाईफ पार्टनर असणे गरजेचे नाही.”
Tejashri Pradhan l ‘त्या’ व्यक्तीला एवढे महत्त्व द्यायचे नाही :
“सगळ्यात आधी एक महत्त्वाची गोष्ट जी मी केली होती माझ्या बाबतीत आणि जर का आज ही गोष्ट खूप कॉमन झाली आहे तर, मला सांगायला आवडेल, माझ्या आयुष्यात जे काही घडले त्यासाठी मला त्या माणसाला दोषी ठरवायचे नाही.
View this post on Instagram
ज्या व्यक्तीने मला वेदना दिल्या आहेत, किंवा माझ्यामुळे त्या व्यक्तीला वेदना झाल्या आहेत. त्यामुळे त्या व्यक्तीला एवढे महत्त्व द्यायचे नाही की सर्व काही तुझ्यामुळे झाले. जे काही व्हायचे होते ते झाले आहे. ते माझ्या नशिबात होणार होते आणि त्यासाठी मी दुसऱ्याला दोषी ठरवून मी त्या माणसाला मोठे करणार नाही,” असेही ती म्हणाली.
स्वतःला माफ करण्याचा सल्ला :
पुढे अभिनेत्री म्हणाली, “अशा परिस्थितीत सर्वात आधी स्वतःला माफ करायचे. कठीण परिस्थितीत आपण जे काही निर्णय घेतो, त्या वेळी ते निर्णय आपल्याला योग्य वाटलेले निर्णय असतात. त्यामुळे आपण आपल्या आयुष्यात काहीतरी चांगलेच करण्याचा निर्णय घेतला होता किंवा समोरच्याच्या आयुष्याची वाट लावण्याचा निर्णय घेतला होता? असे काही नव्हते.
पुढे जाऊन हे होणार होते आणि ते झाले… हा प्रवास ठरलेला होता. एखादे नाते तुटणे ही फार वाईट गोष्ट आहे. फक्त दोघांसाठी नाही तर, दोन्ही कुटुंबासाठी नाते तुटणे ही वाईट गोष्ट असते.” असे म्हणत तेजश्रीने आपल्या भावना व्यक्त केल्या.या मुलाखतीतून तेजश्री प्रधानने घटस्फोटानंतरच्या कठीण काळावर आणि त्यातून बाहेर येण्यासाठी तिने केलेल्या प्रयत्नांवर प्रकाश टाकला आहे. तसेच, तिने इतरांनाही अशा परिस्थितीत स्वतःला माफ करण्याचा आणि पुढे जाण्याचा सल्ला दिला आहे.
News Title : Tejashri Pradhan statement on divorce






