मार्केटमध्ये TATA चा जलवा; कंपनीने केली ‘ही’ मोठी घोषणा!

On: October 29, 2023 1:08 PM
---Advertisement---

मुंबई | सध्या सणासुदीचे दिवस सुरू असून कार कंपन्या ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी नवनवीन वाहने बाजारात आणत आहेत. या महिन्यात कमी नवीन गाड्या होत्या, पण पुढच्या महिन्यात म्हणजे नोव्हेंबरमध्ये बर्‍याच नवीन कार लाँच होणार आहेत.

सर्व प्रथम, मर्सिडीज बेंझ दोन नवीन कार लॉन्च करेल आणि नंतर टाटा मोटर्स, टोयोटा आणि निसान सारख्या कंपन्या देखील वेगवेगळ्या सेगमेंटमध्ये नवीन वाहने लाँच करू शकतात. अशात टाटा मोटर्स बाजारपेठेत आपली नवीन SUV कार बाजारात लाँच करणार असल्याची माहिती आहे.

2024 च्या सुरुवातीला बहुप्रतिक्षित Tata Curvv SUV Coupe सादर करण्याची कंपनीची योजना आहे. सुरुवातीला हे मॉडेल इलेक्ट्रिक पॉवरट्रेनसह लाँच केलx जाईल, त्यानंतर अंतर्गत ज्वलन इंजिन (ICE) आवृत्ती देखील लाँच केली जाईल. याशिवाय Tata Sierra SUV देखील 2025 मध्ये लाँच केली जाऊ शकते.

कंपनी सध्या त्यांच्या उत्पादन पोर्टफोलिओमध्ये समाविष्ट नसलेल्या विभागात प्रवेश करण्याचा विचार करीत आहे. मात्र, या आगामी मॉडेलबाबत टाटा मोटर्सचे व्यवस्थापकीय संचालक शैलेश चंद्र यांनी माहिती दिली नाही.

महत्त्वाच्या बातम्या-

Babita Durande

Babita Durande

Join WhatsApp Group

Join Now