टाटांची मोठी डील, ही बडी कंपनी लवकरच घेणार ताब्यात!

On: November 24, 2022 8:18 PM
---Advertisement---

नवी दिल्ली | मिनरल वॉटर म्हटलं की पहिल्यांदा बिसलेरीचं (Bisleri) नाव आपल्या तोंडातून येतं. हॉटेल, स्टेशन, दुकानं कुठेही जा आपण पाणी विकत घेताना बिसलेरी द्या असंच म्हणतो.

बिसलेरी (Bisleri) मिनरल वॉलरमधील अतिशय विश्वासू ब्रँड आहे. पण आता हाच बिसलेरीचा (Bisleri) ब्रँड टाटांच्या मालकीचा होणार आहे. बिसलेरी (Bisleri) इंटरनॅशनल आणि टाटा कंझ्युमर प्रोडक्ट लिमिटेड यांच्यातील ही डील जवळपास 6000 ते 7000 कोटींची होणार असल्याची माहिती समोर आली आहे.

ही कंपनी विकत घेण्यासाठी नेस्ले आणि रिलायन्स सारख्या कंपन्याही रांगेत होत्या, पण कंपनीचे मालक रमेश चौहान यांनी आपली कंपनी टाटाकडे सोपवण्याचा निर्णय घेतला. हा निर्णय त्यांच्यासाठी सोपा नव्हता. पण त्यांच्या कंपनीला पुढे नेणारा कोणीही उत्तराधिकारी नाही, असं ते म्हणालेत.

माझी मुलगी मुलगी जयंतीला या व्यवसायात विशेष रस नाही. मला या कंपनीला मरू द्यायचं नाही, त्यामुळे ती विकण्याचा निर्णय मला घ्यावा लागला, असं रमेश चौहान यांनी सांगितलं आहे.

मी टाटांना ओळखतो. त्यांच्या कामाची आणि प्रामाणिकपणाची मला ओळख आहे. मला टाटांचा आदर आहे त्यांच्या जीवनातील मूल्ये आवडतात, असंही बिसलेरींच्या मालकांनी सांगितलंय.

भारतातील मिनिरल वॉलरमधील भरवशाचा ब्रॅण्ड म्हणून आज बिसलेरी पहिल्या स्थानावर आहे. बिसलेरीची सुरुवात पहिल्यांदा इटलीमध्ये झाली. 1921 मध्ये फेलिस बिसलेरी यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या कुटुंबातील डॉक्टर रोजेज कंपनीचे मालक बनले.

थोडक्यात बातम्या-

Babita Durande

Babita Durande

Join WhatsApp Group

Join Now