Tata Technology च्या शेअरची बाजारात धमाकेदार एंट्री; गुंतवणूकदार झाले मालामाल

On: November 30, 2023 2:06 PM
Share Market
---Advertisement---

Tata Technology | टाटा टेक्नॉलॉजीने बाजारात धमाकेदार एंट्री केली. बाजार उघडल्यानंतर एका तासातच त्याने गुंतवणुकदारांना दुप्पट नफा मिळवून दिला. जवळपास दोन दशकांनंतर म्हणजे 20 वर्षांनी, टाटा समूहाने त्यांच्या कंपनी टाटा टेक्नॉलॉजीजचा (Tata Technology) IPO आणला. आज शेअर बाजारात मोठी एंट्री झाली आहे आणि टाटा टेक शेअर्सने NSE आणि BSE वर बंपर लिस्टिंगसह व्यवहार सुरू केला आहे.

टाटाच्या शेअरचा बाजारात येताच धुमाकूळ

लिस्टिंगच्या काही वेळातच हा शेअर, बाजारात जवळपास 180% उसळला. टाटा टेक्नॉलॉजीजचा शेअर 1398 रुपयांवर पोहचला. टाटा टेक्नॉलॉजीजचा प्राईस बँड 475-500 रुपये होता. त्या हिशोबाने गुंतवणूकदारांना जोरदार नफा झाला. 19 वर्षांनी आलेल्या टाटा समूहातील या शेअरने बाजारात येताच धुमाकूळ घातला.

आयपीओ एकूण 69 पटीने अधिक सबस्क्राइब झाला

टाटा टेक्नॉलॉजीजचा आयपीओ एकूण 69 पटीने अधिक सबस्क्राइब झाला. यामध्ये, पात्र संस्थात्मक खरेदीदारांसाठी राखीव भाग 203.41 पट भरला गेला. NII साठी राखीव भाग 62.10 वेळा भरला गेला. तर रिटेल गुंतवणूकदारांसाठी राखीव भाग 16.42 पट भरला गेला. कर्मचाऱ्यांसाठी राखीव हिस्सा 3.67 पट आणि इतरांचा हिस्सा 29.12 वेळा भरला गेला.

टाटा मोटर्सचा टाटा टेक्नॉलॉजीजमध्ये 74 टक्के वाटा आहे. तर अल्फा टीसी होल्डिंग्सची 7.2 टक्के आणि टाटा कॅपिटल ग्रोथ फंडचा 3.63 टक्के वाटा आहे. या आयपीओच्या माध्यमातून टाटा मोटर्स 8.11 कोटी, अल्फा टीसी होल्डिंग्स 97.2 लाख आणि टाटा कॅपिटल ग्रोथ फंड 48.6 लाख शेअर्सची विक्री करणार होती.

टाटांच्या कंपनीच्या पदार्पणाच्या शेअर्सचं बाजारानं मोठ्या उत्साहात स्वागत केलं. IPO ला तब्बल 65 टक्के सबस्क्रिप्शन मिळाल्याचं पाहायला मिळालं आहे. टाटा टेक्नॉलॉजीजचं शेअर बाजारात नोव्हेंबर 2021 नंतर सर्वोत्तम लिस्टिंग झाल्याचं बोललं जात आहे.

A return of over Rs 800 per Tata share

महत्त्वाच्या बातम्या- 

Exit poll 2023 | …म्हणून एक्झिट पोल महत्त्वाचे असतात; जाणून घ्या ‘या’ गोष्टी

Maharashtra Weather Update | हवामान विभागाकडून मोठी अपडेट, ‘या’ भागांना गारपीटीचा इशारा

1 डिसेंबरपासून ‘हे’ नियम बदलणार; तुमच्या खिशावर होणार परिणाम

Team India साठी सर्वात मोठी बातमी!

Randeep Hooda | रणदीप हुडा अडकला लग्नबंधनात, पाहा व्हिडीओ

Babita Durande

Babita Durande

Join WhatsApp Group

Join Now