Republic Day 2023 | प्रजासत्ताक दिनी सामनाच्या अग्रलेखातून नरेंद्र मोदींवर निशाणा!

On: January 26, 2023 9:30 AM
---Advertisement---

मुंबई | आज देशाचा 74 वा प्रजासत्ताक दिन (Republic Day 2023) आहे. आजच्या सामनाच्या अग्रलेखातून केंद्र आणि राज्य सरकारवर टीका करण्यात आली आहे.

निवडक लोक तुपाशी आणि बहुसंख्य जनता उपाशी, असे भेसूर चित्र 74 व्या प्रजासत्ताक दिनी दिसत असले तरी भविष्यात बदल घडवावाच लागेल. मूठभरांसाठी काम करणारी सत्ता उलथवून खरेखुरे जनतेचे राज्य यावे यासाठी देशातील प्रजेलाच आता एकजूट दाखवावी लागेल, असं शिवसेनेनं अग्रलेखात म्हटलंय.

घटनाकारांना अपेक्षित असलेला प्रजासत्ताक दिन चिरायू ठेवायचा असेल तर मूठभरांची सत्ता जावो आणि प्रजेची सत्ता येवो हे विद्यमान राज्यकर्त्यांना ठणकावून सांगावेच लागेल, असं सामनाच्या अग्रलेखात म्हटलंय.

हुकूमशाहीच्या दिशेने वाटचाल करणाऱ्या देशातील मूठभरांची सत्ता जावो आणि प्रजेची सत्ता येऊ, अशी टीका आजच्या सामनातून करण्यात आली आहे.

दरम्यान, आजच्या दिवशी संपूर्ण देशभरात विविध कार्यक्रम होतील, लाल किल्ल्यावर तिरंगा फडकवतील, सैनिकांची प्रात्यक्षिके होतील मात्र खरंच प्रजेचं राज्य आले आहे का?, असा सवालही सामनातून करण्यात आला आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

Babita Durande

Babita Durande

Join WhatsApp Group

Join Now