“नाना पाटेकर माझ्या जीवावर उठलाय”, तनुश्री दत्ताचे खळबळजनक आरोप; गँगस्टरशी संबंध असल्याचा दावा

On: July 23, 2025 1:17 PM
Tanushree Dutta
---Advertisement---

Tanushree Dutta | बॉलिवूड अभिनेत्री तनुश्री दत्ता पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. भारतातील #MeToo चळवळीचा चेहरा ठरलेल्या तनुश्रीने एक भावनिक व्हिडीओ शेअर करत नाना पाटेकरवर गंभीर आरोप केले आहेत. “नाना पाटेकर माझ्या जीवावर उठलाय, त्याचे गँगस्टरशी संबंध आहेत,” असा आरोप करत तिने थेट आपल्या मृत्यूचा धोका असल्याचेही सूचित केले आहे.

तनुश्रीने सोशल मीडियावर एक इमोशनल व्हिडीओ शेअर केला असून, त्यात ती रडताना दिसते. तिच्या म्हणण्यानुसार, गेल्या ४-५ वर्षांपासून तिचा मानसिक आणि शारीरिक छळ होत आहे. कोणीतरी तिच्या घरात “हाऊस हेल्पर” प्लांट करून जेवणात काहीतरी मिसळत होते, ती वारंवार आजारी पडत होती. याशिवाय, उज्जैनमध्ये तिचा अपघातही घडवून आणण्यात आल्याचा दावा तिने केला आहे. (Tanushree Dutta Aginst On Nana Patekar)

माझे प्रोजेक्ट्स पद्धतशीर पणे बिघडवले गेले :

तनुश्री म्हणाली की, “२०२० नंतर माझे सगळे मोठे प्रोजेक्ट्स एकामागोमाग एक रद्द झाले. माझा फोन आणि ईमेल हॅक करून सगळी माहिती त्यांना मिळत होती. मी कुठे जाते, कोणाशी बोलते, सगळं कळायचं. मग त्या लोकांकडून माझ्या कारकिर्दीत अडथळे आणले जायचे.” ती पुढे म्हणते, “हे सगळं खूप योजनाबद्धपणे केलं गेलं. मला इंडस्ट्रीतून पूर्णपणे अलग केलं गेलं.”

या आरोपांमध्ये तनुश्रीने नाना पाटेकर, काही गुंडगिरी करणारे लोक आणि ‘गँग’ यांचा स्पष्ट उल्लेख केला आहे. “मराठी माणूस म्हणून सहानुभूती घेतो, पण प्रत्यक्षात माझ्या जीवावर उठला आहे,” असा रोखठोक आरोप करत तिने नाना पाटेकरवर पुन्हा नव्याने वाद निर्माण केला आहे.

Tanushree Dutta | उज्जैनमध्ये ब्रेक फेल करून अपघात घडवला :

तनुश्रीने सांगितले की, “२०२२ मध्ये मी उज्जैनला गेले होते. तेव्हा रिक्षाच्या ब्रेकमध्ये छेडछाड करून माझा अपघात घडवला गेला. माझी प्रकृती खूप खराब झाली होती. मी दोन-तीन महिने अंथरुणावर होते. पण मी पुन्हा उठून उभी राहिले आणि त्यांनी पुन्हा त्रास सुरू केला.” (Tanushree Dutta)

तिने दावा केला की, ही लोकं सातत्याने तिला फॉलो करत असतात. तिच्यावर पाळत ठेवली जाते, जेवणात काहीतरी टाकले जाते, वैयक्तिक जीवनात हस्तक्षेप केला जातो. ती म्हणाली की, “हा एक संगनमताने चालणारा कट आहे, आणि यामागे इंडस्ट्रीतीलच लोकांचा हात आहे.”

News Title: Tanushree Dutta Alleges Nana Patekar Wants to Kill Her; Claims Gangster Links and Life Threat

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now