मुंबईतील कार्यक्रमात ब्रालेस स्पॉट झाली बॉलिवूड अभिनेत्री, पहा व्हिडीओ!

On: May 16, 2025 3:10 PM
Taniya Chatterjee
---Advertisement---

Taniya Chatterjee | ‘गंदी बात’ आणि ‘हाउस ऑफ लाईज’ सारख्या वेबसीरिजमधून ओळख मिळवलेली अभिनेत्री तानिया चॅटर्जी (Taniya Chatterjee) नुकतीच मुंबईत एका कार्यक्रमासाठी हजेरी लावताना दिसली. मात्र तिच्या बोल्ड आणि वादग्रस्त पेहरावामुळे तिचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला असून, तिला नेटिझन्सकडून तीव्र प्रतिक्रिया मिळत आहेत.

फक्त ब्लेजर घालून रस्त्यावर; –

मुंबईत नुकत्याच झालेल्या एका पब्लिक स्पॉटिंग दरम्यान तानिया चॅटर्जी (Taniya Chatterjee) केवळ ब्लेजर आणि काळ्या स्कर्टमध्ये दिसली. ती ब्रालेस होती आणि डिझायनर ब्लेजरच्या माध्यमातून तिचा फिगर ठळकपणे दाखवत होती. केस खुले सोडलेले असताना तिने पापाराझींना विविध पोझ देत फोटोसाठी पोज दिल्या. हा व्हिडिओ व्हायरल होताच, सोशल मीडियावर तिच्या लूकबाबत चर्चा सुरु झाली आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Instant Bollywood (@instantbollywood)

नेटिझन्सनी तिच्यावर अश्लीलतेचा आरोप करत विविध प्रकारचे टीकासत्र सुरू केलं. एक युजर म्हणाला, “हे सगळं प्रसिद्धीसाठीच होतंय,” तर दुसऱ्याने लिहिलं, “हवेचा झोत आला तर सगळं संपलं.” अनेकांनी सरकारने अशा प्रकारांवर कारवाई का करत नाही, असा सवाल उपस्थित केला आहे. काहींनी तर तिला “उर्फी जावेदची आई वाटते” अशा शब्दांत ट्रोल केलं आहे.

प्रसिद्धीसाठी बोल्डनेसचा आधार?

तानिया चॅटर्जी (Taniya Chatterjee) सोशल मीडियावर खूप अ‍ॅक्टिव्ह असून, नेहमीच तिचे ग्लॅमरस फोटो आणि व्हिडिओज शेअर करत असते. मात्र यावेळेस तिच्या कपड्यांची निवड अनेकांना न पटल्याने तिच्यावर टीकेची झोड उठली आहे. सोशल मीडियावर तिचा व्हिडिओ पाहून अनेकांनी तिला बॅन करण्याची मागणी केली आहे.

‘गंदी बात’, ‘उठा पटक’ यासारख्या बोल्ड कंटेंटसाठी ओळख असलेल्या तानिया चॅटर्जीने पुन्हा एकदा आपल्या लूकमुळे चर्चेत येण्याचा प्रयत्न केला का? असा प्रश्न देखील अनेकांना पडला आहे. सध्या सोशल मीडियावर तिच्या वेशभूषेचा व्हिडिओ आणि त्यावरची टीका चांगलीच गाजते आहे.

News Title – Taniya Chatterjee Bold Look Sparks Online Backlash

Mrudula Jogdand

Mrudula Jogdand

Join WhatsApp Group

Join Now