ऋषिराज बँकॉकला का चालला होता?; तानाजी सावंतांच्या लेकाने सांगितलं सगळं खरं

On: February 11, 2025 2:28 PM
Tanaji Sawant Son
---Advertisement---

Tanaji Sawant Son | शिवसेना नेते तानाजी सावंत यांच्या मुलाचा (Tanaji Sawant Son) बँकॉकला जाणारा चार्टर्ड फ्लाइटप्रवास सोमवारी अचानक चर्चेचा विषय ठरला. तानाजी सावंत यांनी आपल्या मुलाच्या कथित अपहरणाची तक्रार केल्यानंतर पुणे पोलिसांनी अत्यंत जलद कारवाई करत विमान माघारी वळवले. यामुळे राजकीय वर्तुळात तानाजी सावंत (Tanaji Sawant) यांचे प्रभाव आणि पुणे पोलिसांची तत्परता चर्चेचा विषय बनली आहे.

तानाजी सावंत (Tanaji Sawant) यांचा मुलगा ऋषिराज सावंत हा अचानक घरातून बाहेर पडला आणि बँकॉकला जाण्यासाठी चार्टर्ड फ्लाइट बुक केली. याबाबत पोलिसांना माहिती मिळाल्यावर तानाजी सावंत यांनी प्रचंड अस्वस्थ होऊन पुणे पोलिसांकडे अपहरणाची तक्रार दिली. यावरून पोलिसांनी वाऱ्याच्या वेगाने कार्यवाही करत ऋषीराज सावंत यांना पुण्यात लँड करण्यात यश मिळवले.

Tanaji Sawant Son | गिरीराज सावंत यांचे स्पष्टीकरण

माझा लहान भाऊ ऋषिराज सावंत याच्याशी संपर्क होत नव्हता, तेव्हा तो कुठे निघून गेला कळत नव्हतं म्हणून तानाजी सावंत प्रचंड अस्वस्थ झाले होते आणि त्यानंतरच आम्ही सिंहगड पोलीस स्टेशन या ठिकाणी अपहरणाची तक्रार दिली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांना देखील फोन करून तानाजी सावंत यांनी मदतीसाठी विनंती केली असल्याचे सांगितले. या तक्रारीनंतर तो बँकॉकला काही कामानिमित्ताने गेला असल्याचे समजले अशी माहिती गिरीराज सावंत यांनी दिली.

दहा दिवस अगोदरच ऋषिराज हा दुबईला जाऊन आला होता. पुन्हा एकदा बँकॉकला का चाललाय असे घरचे विचारतील. या कारणाने त्याने घरात कोणालाच न सांगता खासगी विमान बुक केले आणि बँकॉकला निघाला होता, अशी माहिती गिरीराज सावंत यांनी दिली.

“कृपया राजकारण करू नका”

या प्रकरणात विरोधकांकडून राजकारण केलं जात असल्याचं गिरीराज सावंत यांनी सांगितलं. त्यांनी आपल्या विरोधकांना आवाहन केलं आहे का  “त्यांच्या मुलांबाबतही विचार करा आणि कृपया राजकारण करू नका.” तसेच, त्यांनी पोलिसांच्या कार्यतत्परतेचे कौतुक करत, तपासासाठी त्यांना सहकार्य करण्याची इच्छा व्यक्त केली.

पुणे पोलिसांनी काही तासांच्या आत ऋषीराज सावंत यांचे विमान माघारी वळवले आणि त्यांना पुणे लँड करण्यात यश मिळवले. यामुळे पुणे पोलिसांच्या कार्यतत्परतेचे सगळीकडे कौतुक होत आहे, आणि प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर सकारात्मक प्रतिसाद मिळाला आहे.

Babita Durande

Babita Durande

Join WhatsApp Group

Join Now