ताम्हिणी घाटात भीषण अपघात! दोनजण बेपत्ता, चौघांचा मृत्यू, नावं आली समोर

On: November 20, 2025 4:41 PM
Mumbai-Nashik Highway Accident
---Advertisement---

Tamhini Ghat Accident | ताम्हिणी घाटातील धोकादायक वळणांनी पुन्हा एकदा जीव घेतला आहे. कोकण सफारीसाठी निघालेल्या सहा तरुणांची गाडी खोल दरीत कोसळल्याने चार जणांचा मृत्यू झाला असून दोन मित्र अजूनही बेपत्ता आहेत. घटनेला तीन दिवस उलटून गेल्यानंतर आज सकाळी ड्रोनच्या मदतीने दरीत वाहन आणि मृतदेह आढळून आल्यानंतर हा संपूर्ण प्रकार उघडकीस आला. पुण्यातील कोंढवे (Kondhve), धावडे आणि कोपरे गावातील हे सहा मित्र 17 नोव्हेंबरच्या रात्री घरातून उत्साहाने निघाले होते. मात्र काही तासांतच त्यांच्या आयुष्याचा शेवट ताम्हिणी घाटातील खोल दरीत झाला. (Tamhini Ghat Accident)

17 नोव्हेंबरच्या रात्री 11.30 वाजता पुण्याहून निघालेल्या या तरुणांचा वाटेतच कुटुंबीयांशी संपर्क तुटला. सतत संपर्क न झाल्यानंतर कुटुंबीयांनी उत्तमनगर पोलीस ठाण्यात हरवल्याची तक्रार नोंदवली. पोलिसांनी तातडीने सीसीटीव्ही फुटेज, मोबाइल लोकेशन आणि तांत्रिक तपासाच्या आधारे शोधमोहीम सुरू केली. तपासादरम्यान संशय थेट ताम्हिणी घाट परिसरावर गेला आणि त्यानंतर पोलिसांनी शोध वाढवत नेला. घाटातील धोकादायक वळणांचा विचार करता, पोलिसांनी ड्रोनच्या मदतीने शोध घेतला असता खोल दरीत या तरुणांचा थार आणि मृतदेह दिसून आले.

500 फूट खोल दरीत थार आढळली; चार मृतदेह बाहेर, दोन मित्र बेपत्ता :

आज सकाळी पोलिस आणि आपत्ती व्यवस्थापन पथकांनी ड्रोन (Drone) उडवल्यानंतर जवळपास 500 फूट खोल दरीत एक पांढरी थार आणि चार तरुणांचे मृतदेह दिसले. दरी अत्यंत उभी आणि दगडी असल्यामुळे बचावकार्य अतिशय कठीण झाले आहे. मृतांमध्ये शहाजी चव्हाण (22), पुनित सुधारक शेट्टी (20), साहिल बोटे (24) आणि महादेव कोळी (18) यांचा समावेश आहे. तर ओंकार कोळी (18) आणि शिवा माने (19) हे दोन मित्र अद्यापही बेपत्ता असून शोधमोहीम सुरू आहे.

रायगड (Raigad) आपत्ती व्यवस्थापन पथक, माणगाव पोलीस, मुळशी आपत्ती व्यवस्थापन समिती आणि स्थानिक ग्रामस्थ मिळून बचावकार्य सुरू आहे. परिसरातील खोल दऱ्या, घनदाट जंगल आणि उभी उतारामुळे बचावकार्याला विलंब होत आहे. अनेक वेळा पथकांना रस्सीची मदत घेऊन दरीत उतरणेही कठीण जात आहे.

Tamhini Ghat Accident | ताम्हिणी घाटातील धोकादायक वळणांचा पुन्हा घेतला बळी :

ताम्हिणी घाट (Tamhini ghat) हा पूर्वीपासून धोकादायक म्हणून ओळखला जातो. अचानक येणारी वळणं, खोल दऱ्या आणि रात्रीची दाट धुके यामुळे येथे अनेकदा भीषण अपघात घडतात. प्राथमिक माहितीप्रमाणे, तीव्र वळणावर चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि थार थेट दरीत कोसळली असल्याचा पोलिसांचा अंदाज आहे. गाडी कोसळताना मोठा आवाज किंवा हालचाल ऐकू न आल्याने तीन दिवसांपासून हा अपघात कोणाच्या लक्षातही आला नव्हता. (Tamhini Ghat Accident)

या भीषण घटनेनंतर ताम्हिणी घाटातील सुरक्षा उपाययोजना, रस्त्यावरील रेलिंग्स, चेतावणी फलक आणि लाइटिंग सुधारण्याची मागणी पुन्हा एकदा जोर धरू लागली आहे. स्थानिक ग्रामस्थांनीही अनेक वर्षांपासून या घाटातील सुरक्षा बळकट करण्याची मागणी केली होती. मात्र या अपघातानंतर प्रशासनावर अधिक जबाबदारी येत आहे.

News Title: Tamhini Ghat Accident: Four Friends Dead, Two Missing After Thar Falls 500 Feet Into Valley Near Pune

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now