कंगनानंतर ‘ही’ अभिनेत्रीही करणार राजकारणात एंट्री?, चर्चांना उधाण

On: March 27, 2024 11:36 AM
Talks of Sara Ali Khan entering politics 
---Advertisement---

Sara Ali khan | अभिनेत्री कंगना रनौतने राजकारणात एंट्री केली आहे. तिला भाजपने आगामी लोकसभा निवडणुकीचं तिकीट दिलं आहे. कंगनाला हिमाचल प्रदेशमधील मंडी येथून उमेदवारी जाहीर केली आहे. आता कंगनानंतर अजून एक अभिनेत्री राजकारणात येणार असल्याची जोरदार चर्चा आहे.

अभिनेत्री सारा अली खान हिचा एक जुना व्हिडीओ सध्या सोशल मिडियावर व्हायरल होत आहे. एका मुलाखतीत सारा हिला राजकारणात प्रवेश करणार का? असा प्रश्न विचारण्यात आला. यावर अभिनेत्रीने स्पष्ट होकार दिला दिला. त्यामुळे सध्या सर्वत्र सारा अली खान हिची चर्चा रंगली आहे.

सारा अली खान राजकारणात येणार?

साराच्या या व्हिडीओवर नेटकरीही अनेक प्रतिक्रिया देत आहेत. साराला राजकारणामध्ये येणार का?, असा सवाल करण्यात आला होता. यावर ती म्हणाली होती की, ‘हो… मी राजकारणात प्रवेश करु शकते…’, त्यामुळे सध्या सर्वत्र साराच्या (Sara Ali khan) वक्तव्याची चर्चा रंगली आहे.

रेडिटवर अभिनेत्री सारा अली खान हिचा हा व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे. यावर एक नेटकरी म्हणाला की,‘ही लोकं कोणतंच क्षेत्र सोडणार नाहीत…’ दुसरा नेटकरी म्हणाला, ‘सारा आजी रुखसाना सुल्तान यांच्या पाऊलावर पाऊल ठेवणार असं चिन्ह दिसत आहे.’ तिसरा नेटकरी म्हणाला, ‘सारा अली खान खूप चांगलं बोलते, ज्याची मदत तिला राजकारणात होईल…’ अशा प्रतिक्रिया आता नेटकरी नोंदवत आहेत.

साराचा रेडिटवर व्हिडीओ व्हायरल

त्यात एका यूजरची कमेंट लक्षवेधी ठरली आहे. ‘हेमा मलिनी, रेखा, जया बच्चन, कंगना रनौत राजकारणात प्रवेश करु शकतात तर, सारा अली खान देखील करू शकते…’, असं हा यूजर म्हणाला आहे. कंगनाला नुकतीच उमेदवारी जाहीर झाली आहे. त्यातच आता साराचा हा व्हिडीओ चर्चेत आला आहे.

दरम्यान, अभिनेत्री सारा (Sara Ali khan) सध्या तिच्या ‘मर्डर मुबारक’ आणि ‘ऐ वतन मेरे वतन’ सिनेमामुळे चर्चेत आहे. यातील साराच्या भूमिकेचं सर्वत्र कौतुक केलं जात आहे. आता सारा निवडणुकीमुळे चर्चेत अली आहे. तसा व्हायरल होणारा व्हिडीओ जुना असला तरी त्याची आता तूफान चर्चा होतेय.

News Title : Talks of Sara Ali Khan entering politics 

महत्त्वाच्या बातम्या –

रोहित शर्माचा SRH च्या शिलेदाराला फ्लाइंग किस; फोटोनं जिंकलं मन!

“मी तुमचा राग समजू शकतो पण…”, हार्दिकला ट्रोल करणाऱ्यांवर सेहवाग संतापला!

…अन् शुभमन गिलला मागावी लागली माफी; टॉसदरम्यान नेमकं काय घडलं?

लग्नाच्या चर्चेदरम्यानच तापसीचा ‘तो’ फोटो समोर; चाहते संभ्रमात

“श्रीकृष्णाच्या विरोधात सारी भावकी होती पण…”; सुनेत्रा पवारांची पोस्ट चर्चेत

Join WhatsApp Group

Join Now