गोविंदा पाठोपाठ संजय दत्तही राजकारणात कमबॅक करणार?, मोठी माहिती समोर

On: April 9, 2024 12:22 PM
Talk of Sanjay Dutt entering politics 
---Advertisement---

Sanjay Dutt | अभिनेता गोविंदा आणि अभिनेत्री कंगना यांनी राजकारणात प्रवेश केला आहे. गोविंदाने एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेच्या शिंदे गटात प्रवेश केला. गोविंदा हा शिवसेनेचा स्टार प्रचारक झाला आहे. तर कंगनाला भाजपाने थेट लोकसभेचं तिकीट दिलं आहे.

कंगना हिमाचल प्रदेशमधील मंडी येथून लोकसभा निवडणूक लढवणार आहे. आता या पाठोपाठ अभिनेता संजय दत्तही राजकारणात कमबॅक करण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे. खुद्द संजूबाबाने सोशल मीडियावर पोस्ट करत यामागील सत्य सांगितलं आहे.

सोशल मीडियावर सध्या संजय दत्त राजकारणात उतरला तर कोणत्या पक्षासाठी काम करेल, कोणत्या मतदार संघातून निवडणूक लढवेल?, अशा अनेक चर्चा रंगल्या आहेत. अशात रंगणाऱ्या चर्चांवर खुद्द संजय दत्तने (Sanjay Dutt ) एक्सच्या (पूर्वीचे ट्वीटर) माध्यामातून पूर्णविराम दिला आहे.

संजय दत्तची पोस्ट चर्चेत

मी राजकारणात येणार अशा रंगणाऱ्या चर्चांवर मी पूर्णविराम लावतो. मी कोणत्याच पक्षात प्रवेश करुन निवडणूक लढवणार नाही. असं काही करायचं असेल तर मी लपवणार नाही.जर मी राजकारणात उतरण्याचा विचार करत असेल तर, सर्वप्रथम घोषणा करेल. माझ्याबद्दल ज्या चर्चा रंगत आहेत, त्यामध्ये काहीही तथ्य नाही., अशी पोस्ट संजय दत्तने (Sanjay Dutt ) केली आहे.

या पोस्टद्वारे संजय दत्तने राजकारणात येण्याच्या चर्चेवर पूर्णविराम लावला आहे. यापूर्वी संजय दत्तने 2009 ची लोकसभा निवडणूक समाजवादी पक्षाचा उमेदवार म्हणून लढवण्याचा निर्णय घेतला होता. पण, नंतर त्याने स्वतःचं नाव मागे घेतलं. त्याचे वडील प्रसिद्ध अभिनेते सुनील दत्त काँग्रेस पक्षाचे खासदार होते.

दरम्यान, संजय दत्तच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर, तो लवकरच ‘द व्हर्जिन ट्री’ सिनेमातून चाहत्यांचं मनोरंजन करणार आहे. सिनेमात संजूबाबासोबत अभिनेत्री मौनी रॉय आणि पलक तिवारी देखील आहे. ‘वेलकम टू द जंगल’ सिनेमातून देखील तो चाहत्यांच्या भेटीस येणार आहे.

News Title- Talk of Sanjay Dutt entering politics 

महत्त्वाच्या बातम्या-

सर जडेजाने केला नवा विक्रम; हा पराक्रम आजपर्यंत कोणालाही करता आला नाही

शिखर धवनची पलटण कमिन्सच्या शिलेदारांना रोखणार का?

गुढीपाडव्याच्या दिवशी चुकूनही ‘या’ गोष्टी करू नका; अन्यथा कठीण प्रसंगाला सामोरे जावे लागेल

या दोन राशींच्या लोकांना व्यवसायाला यश मिळेल

ऐश्वर्याचा घटस्फोट होणार!, 18 वर्षांचं नातं तोडण्यासाठी दोघे कोर्टात

Join WhatsApp Group

Join Now