Farmer | राज्यात अनेक जिल्ह्यात शेतकरी अवकाळी पावसामुळे अडचणीत आहे. यंदाच्या वर्षी राज्याच्या काही भागात पाहिजे तसा पाऊस पडला नाही. त्यामुळे बहुतांश भागात दुष्काळग्रस्त स्थिती पाहायला मिळाली. शिवाय काही महिन्यांपूर्वी महाराष्ट्रच्या काही जिल्ह्यात देखील पावसाने हजेरी लावली होती. मात्र यावेळेस देखील पावसामुळे आणि गारपिटीमुळे पीकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आणि याचा शेतकऱ्यांना चांगलाच फटका बसला. दरम्यान हिंगोलीमध्ये शेतकऱ्यांनी या गोष्टीला वैतागून अवयव विक्रीला काढल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
काय आहे नेमका प्रकार?
राज्यात दुष्काळग्रस्त परिस्थिती निर्माण झाली असून, शेतकऱ्यांचे (Farmer) खाण्यापिण्याचे हाल होत असल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान, हिंगोली जिल्ह्यात दुष्काळामुळे हैराण होऊन इथल्या शेतकऱ्यांनी अवयव विकायला काढले आहेत. शेतामध्ये कोणतंच पीक नाही शिवाय विक्रिला देखील काहीच उरलं नाही. या सोबतच कुटुंब उदरनिर्वाहाचा प्रश्न उपस्थित होत आहे.
या सर्व गोष्टी लक्षात घेत शेतकऱ्यांनी आमचं रक्त विकत घ्या आणि त्याबदल्यात आम्हाला आमचे पोट भरण्यासाठी अन्न द्या, अशी मागणी शेतकऱ्यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे.
शासकीय मदत नाही
सरकारकडे वारंवार मागणी करुन देखील याकडे लक्ष दिलं जात नाहीये. त्यामुळे शेतकऱ्यांवर (Farmer) ही वेळ आली आहे, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. गेल्या तीन वर्षांपासून जिल्यह्यात दुष्काळी परिस्थिती आहे. प्रचंड पीकहानी होऊनसुद्धा पीक विम्याचा एक रुपयाचाही परताव मिळालं नाही अशी माहिती समोर आली आहे.
शेतकऱ्यांकडून आंदोलन
जिल्ह्यात पाहिजे तसा पाऊस न पडल्यामुळे गेल्या तीन वर्षांपासून शेतकऱ्यांवर संकट आलं आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी अनेकवेळा आंदोलन देखील केलं. मात्र याकडे सरकारकडून कुठलीच शासकीय मदत मिळाली नाही. आणि म्हणून शेतकऱ्यांनी सरकारकडे रक्त काढून घ्या पण खायला अन्नधान्य द्या अशी विनंती केली आहे.
दुष्काळामुळे शेतकरी कंगाल झाले आहेत. त्यामुळे कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा भागवायचा? असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे. आणि हाच मुदत मांडत शेतकऱ्यांनी रक्त विक्रिची मागणी केली आहे.
News Title : take away the blood and give the foods says farmer
महत्त्वाच्या बातम्या-
India Vs England Test Series | पराभवानंतर टीम इंडियाला मोठा धक्का; ‘हा’ मोठा खेळाडू होणार बाहेर
संसदेत तूफान राडा; खासदारांनी एकमेकांना उचलून फेकलं
Bigg Boss 17 | डोंगरीचा स्टार मुनव्वर झाला मालामाल; ‘बिग बॉस’च्या ट्रॉफीसह मिळाली ‘एवढी’ रक्कम
Ahmednagar Accident | मन सुन्न करणारी घटना; कंटेनरच्या धडकेमुळे भीषण अपघात, सहा महिन्यांच्या बाळासह…
Ncp | राष्ट्रवादी काँग्रेस आमदार अपात्रता प्रकरणी मोठी अपडेट समोर!






