Jheel Mehta | TMKOC फेम ‘सोनूला’ अखेर मिळाला रियल लाईफ टप्पू; लवकरच अडकणार लग्नबंधनात

On: January 3, 2024 6:52 PM
Jheel Mehta
---Advertisement---

Jheel Mehta | ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ (TMKOC) या सुप्रसिद्ध मालिकेतील’सोनू’ लवकरच लग्नाच्या बंधनात अडकणार आहे. या मालिकेमधील बालपणीच्या सोनूची भूमिका साकारणारी अभिनेत्री झील मेहता (Jheel Mehta) ही बॉयफ्रेंड आदित्यसोबत (Aditya) लग्नाच्या बोहल्यावर चढणार आहे. आदित्यने तिला अगदी फिल्मी अंदाजात प्रपोज करत लग्नाची मागणी घातली. झील मेहताने प्रपोज करतानाचा व्हिडीओ आपल्या इन्स्टाग्रामवर अकाउंटवर पोस्ट करत सर्वांनाच धक्का दिला आहे. या पोस्टवर टप्पूची भूमिका साकारणाऱ्या भव्य गांधीनेही प्रतिक्रिया दिली आहे.

Jheel Mehta लवकरच अडकणार लग्नबंधनात

झीलने पोस्ट केलेल्या व्हिडीओमध्ये ती खूपच आनंदीत दिसत आहे. गुलाबी रंगाच्या वनपीस ड्रेसवर झील खूपच सुंदर दिसत आहे. तर आदित्यने काळ्या रंगाचा सूट घालत शाहरुख खानच्या ‘कुछ कुछ होता है’ या चित्रपटातील ‘कोई मिल गया’ या गाण्यावर अगदी फिल्मी अंदाजात डान्स करत तिला लग्नाची मागणी घातली. याला झीलनेही लगेच होकार देत त्याला मिठी मारली.

या व्हिडिओला झीलने “कोई मिल गया, मेरा दिल गया. लव आज कल” असे कॅप्शन दिले आहे. या पोस्टवर भव्य गांधीनेही कमेंट केली आहे. त्याने एक रेड हार्ट इमोजी पोस्ट करत झीलला शुभेच्छा दिल्या आहेत. तसेच तीच्या या व्हिडिओवर चाहत्यांच्याही अनेक प्रतिक्रिया उमटत आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by Jheel Mehta (@jheelmehta_)

‘सोनू’च्या भूमिकेने Jheel Mehta ला मिळाली प्रसिद्धी|

झील मेहताने तारक मेहता का उल्टा चष्मा या मालिकेत ‘सोनू’ची भूमिका बरीच वर्ष निभावली. मात्र, काही काळानंतर तिने शिक्षणाचे कारण देत मध्येच  मालिका सोडली होती. तारक मेहता (TMKOC) नंतर ती अन्य कुठल्याच मालिकेत दिसून आली नाही. मात्र, सोशल मिडीयावर ती नेहमीच सक्रीय दिसून येते. तीला बालपणीची ‘सोनू’ या भूमिकेमुळे चांगलीच प्रसिद्धी मिळाली होती. तिला प्रेक्षकांनीही दाद दिली होती.

दरम्यान, झील मेहताने आपल्या लग्नाची तारीख अजूनतरी गुपितच ठेवली आहे. 28 वर्षाची झील आणि आदित्य हे बऱ्याच वर्षांपासून एकमेकांना डेट करत आहेत. आता ते नेमके लग्न कधी करणार, याकडे सर्वांच्या नजराअसणार आहेत.

थोडक्यात बातम्या-

Jayant Patil | राष्ट्रवादीच्या शिबिराला ‘या’ नेत्याची दांडी; राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

Adani Group | हिंडनबर्ग प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाचा अदानींना मोठा दिलासा!

Munawar Faruqui | ‘त्याला पोरींसोबत…’; अंजली अरोराचा मुनव्वर फारुकीवर गंभीर आरोप

Ramdas Athawale | “अयोध्येत राम मंदीर किंवा बाबरी मशीद नव्हती, तर”; रामदास आठवलेंचा खळबळजनक दावा

Mahanand Dairy | महाराष्ट्रासाठी धक्कादायक बातमी; आणखी एक व्यवसाय गुजरातकडे?

Taarak Mehta Ka Ooltah Chashmah Fame Jheel Mehta Marriage Proposal

Join WhatsApp Group

Join Now