T20 World Cup 2024 l टी-20 विश्वचषक स्पर्धेचे वेळापत्रक जाहीर! ‘या’ तारखेला होणार भारत-पाक यांच्यात महामुकाबला

On: January 6, 2024 6:43 AM
T20 World Cup 2024
---Advertisement---

T20 World Cup 2024 l मागील वर्षात (2023) मध्ये एकदिवसीय विश्वचषकात पॅट कमिन्सच्या कांगारूंनी टीम इंडियाचा पराभव केला अन् अवघ्या काही क्षणातच भारतातील 140 कोटी जनतेच्या भावनांचा चक्काचूर झाला. पण, 2024 या नव्या वर्षात गेल्या वर्षाची जखम भरुन काढण्याची रोहित शर्माच्या शिलेदारांना मोठी संधी असणार आहे. कारण आता लवकरच टी-20 विश्वचषक स्पर्धे रंगणार असून याबाबतच सविस्तर वेळापत्रक आंतरराष्ट्रीय क्रिकेट संघटनेने (ICC) ने जाहीर केले आहे.

भारतीय संघाचा पहिला पहिला सामना कधी? :

T20 World Cup 2024 l ICC ने जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसार.., यंदाचा T20 विश्वचषक वेस्ट इंडिज आणि अमेरिकेत खेळवला जाणार आहे. तर भारतीय संघ या स्पर्धेतील पहिला सामना 5 जून रोजी आयर्लंडविरुद्ध खेळणार असल्याचे दाखवण्यात आले आहे. एवढेच नव्हे तर टीम इंडियाचा सामना 9 जून रोजी भारताचा मुख्य प्रतिस्पर्धी पाकिस्तानशी होणार असून, ही लढत या स्पर्धेतील मुख्य स्पर्धा असणार आहे. टीम इंडिया यावेळी ग्रुप स्टेजमध्ये एकूण 4 सामने खेळणार असून 1 जूनपासून टी-20 विश्वचषकाला सुरुवात होणार आहे.

T20 World Cup 2024 l या विश्वचषकात कोणता संघ कोणत्या गटात :

Group A : भारत, पाकिस्तान, आयर्लंड, कॅनडा, अमेरिका
Group B : इंग्लंड, ऑस्ट्रेलिया, नामिबिया, स्कॉटलंड, ओमान
Group C : न्यूझीलंड, वेस्ट इंडिज, अफगाणिस्तान, युगांडा, पापुआ न्यू गिनी
Group D : दक्षिण आफ्रिका, श्रीलंका, बांगलादेश, नेदरलँड, नेपाळ

T20 World Cup 2024 l कसे असणार लीग स्टेजपासून ते अंतिम सामन्यांचे नियोजन :

लीग स्टेज सामने – 1 ते 18 जून.
सुपर 8 सामने – 19 ते 24 जून.
उपांत्य फेरीचे सामने – 26 आणि 27 जून.
अंतिम सामना – 29 जून.

T20 World Cup 2024 l टीम इंडियाचे या विश्वचषक मालिकेतील सामने :

5 जून 2024 : भारत विरुद्ध आयर्लंड
9 जून 2024 : भारत विरुद्ध पाकिस्तान
12 जून 2024 : भारत विरुद्ध अमेरिका
15 जून 2024 : भारत विरुद्ध कॅनडा

महत्त्वाच्या बातम्या-

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now