आरोपीचा डीएनए अहवाल…; स्वारगेट बलात्कार प्रकरणात मोठी अपडेट समोर

On: March 5, 2025 8:52 AM
Swargate Rape Case Police to File Chargesheet Within 15 Days 
---Advertisement---

Swargate Rape Case | स्वारगेट एसटी डेपो परिसरात बसमध्ये तरुणीवर झालेल्या बलात्कार प्रकरणात मोठी अपडेट समोर आली आहे. आरोपी दत्तात्रय गाडे याच्याविरोधात १५ दिवसांत न्यायालयात आरोपपत्र दाखल करण्यात येणार आहे. (Swargate Rape Case)

स्वारगेट बलात्कार प्रकरणामुळे संपूर्ण राज्यात खळबळ उडाली होती. या प्रकरणाचा पुणे पोलिसांनी जलदगतीने तपास करत आरोपीला  ७२ तासांत अटक केली. आरोपी दत्ता गाडे याला १२ मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. यानंतर आता त्याच्या डीएनए रिपोर्टसह वैद्यकीय पुरावे आणि अन्य साक्षीपुरावे गोळा करून आरोपपत्र तयार केले जात आहे.

लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपीचा डीएनए अहवाल आणि न्यायवैद्यक पुरावे एकत्रित करून साधारण 15 दिवसांत न्यायालयात आरोपपत्र दाखल करण्यात येणार आहे. या प्रकरणात पीडितेच्या कुटुंबीय आणि मित्राचा जबाब नोंदविण्यात आला आहे.

आरोपपत्रात पुढील महत्त्वाचे पुरावे असणार –

डीएनए चाचणीचा अहवाल
न्यायवैद्यक तपासणी अहवाल (Forensic Report)
ससून रुग्णालयाचा वैद्यकीय तपासणी अहवाल
 बसमधील न्यायवैद्यक पुरावे
सीसीटीव्ही फुटेज आणि पीडितेच्या जबानी

कोर्टात सरकारी वकिल काय म्हणाले होते?

या प्रकरणात आरोपीच्या वकिलांनी कोर्टात मोठा दावा केला की, “पीडिता स्वतः बसमध्ये गेली आणि संबंध मर्जीने झाले.” मात्र, सरकारी वकिलांनी हा दावा फेटाळून लावला आणि आरोपीच्या विरोधात साक्षी-पुरावे कोर्टात मांडले. (Swargate Rape Case)

Title : Swargate Rape Case Police to File Chargesheet Within 15 Days 

 

Join WhatsApp Group

Join Now