पावसाळ्यात फिरायला जायचंय? तर मुंबईजवळील ‘ही’ ठिकाणे आहेत बेस्ट!

On: August 11, 2026 2:12 PM
Monsoon Travel
---Advertisement---

Monsoon Travel | पावसाळा सुरू झाला की डोंगररांगा हिरवाईने न्हाऊन निघतात, घाटांमध्ये धुक्याची चादर पसरते आणि ठिकठिकाणी धबधबे प्रवाहित होतात. अशा आल्हाददायक वातावरणात जोडीदारासोबत काही निवांत क्षण घालवण्याची मजाच वेगळी असते. मुंबईच्या (Mumbai) आसपास काही तासांच्या अंतरावर अशी अनेक पर्यटनस्थळे आहेत, जिथे निसर्गाचा आनंद आणि रोमँटिक वातावरणाचा अनुभव घेता येतो.

लोणावळ्यापासून माथेरानपर्यंत निसर्गरम्य पर्याय :

लोणावळा हे मुंबईपासून सुमारे 85 किलोमीटर अंतरावर असलेले पावसाळ्यातील प्रसिद्ध पर्यटनस्थळ आहे. पावसाच्या सरी सुरू झाल्यानंतर येथील डोंगर, घाट आणि परिसराचे रूप अधिकच खुलते. भुशी धरण, टायगर पॉइंट, लायन्स पॉइंट आणि राजमाची परिसरात हिरवाई आणि ढगांनी वेढलेले डोंगर पाहायला मिळतात. थंड वातावरणात निसर्गाचा आनंद घेत जोडीदारासोबत वेळ घालवण्यासाठी लोणावळा आकर्षक पर्याय ठरतो.

दुसरीकडे, नाशिकच्या (Nashik) दिशेने असलेले इगतपुरी (Igatpuri) देखील पावसाळ्यात अत्यंत सुंदर दिसते. उंच पर्वतरांगा, विविध आकाराचे धबधबे, हिरव्यागार वाटा आणि प्रसन्न वातावरण यामुळे हे ठिकाण कपल्समध्ये लोकप्रिय आहे. ट्रेकिंगची आवड असणाऱ्यांनाही इगतपुरी परिसरात भटकंतीसाठी अनेक पर्याय मिळतात.

Monsoon Travel | भंडारदऱ्यात अनुभवता येईल शांत निसर्ग :

माथेरान (Matheran) हे मुंबईजवळील आणखी एक वेगळे हिल स्टेशन आहे. भारतातील मोजक्या वाहनमुक्त पर्यटनस्थळांमध्ये त्याचा समावेश होतो. त्यामुळे वाहनांच्या गोंगाटापासून दूर चालत निसर्गाचा अनुभव घेता येतो. येथील विविध व्ह्यू पॉइंट्सवरून दिसणारे धुक्याने झाकलेले डोंगर आणि हिरवाई पावसाळ्यात विशेष आकर्षक भासते. पर्यटकांना घोडेस्वारीचा अनुभव घेता येतो, तर टॉय ट्रेनमधून प्रवास करण्याचाही आनंद घेता येतो. शांत वातावरणात जोडीदारासोबत निवांत वेळ घालवायचा असेल तर माथेरानचा विचार करता येतो.

भंडारदरा (Bhandardara) हे गर्दीपासून काहीसे दूर राहून निसर्गाचा आनंद घेऊ इच्छिणाऱ्या जोडप्यांसाठी चांगले ठिकाण आहे. पावसाळ्यात आर्थर लेक, रंधा धबधबा, विल्सन धरण आणि परिसरातील हिरवळ अधिकच मनमोहक दिसते. तलावाच्या आसपासचे शांत वातावरण आणि डोंगर-दऱ्यांचे दृश्य यामुळे निवांत वेळ घालवता येतो.

News title :  Romantic Monsoon Getaways Near Mumbai

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now