दिल्ली कॅपिटल्सच्या स्टार खेळाडूला अटक! जाणून घ्या नेमकं प्रकरण काय?

On: August 11, 2026 4:46 PM
Abhishek Porel Arrested
---Advertisement---

Abhishek Porel Arrested | आयपीएलमध्ये दिल्ली कॅपिटल्सकडून खेळणारा युवा क्रिकेटपटू अभिषेक पोरेल (Abhishek Porel) सध्या गंभीर आरोपांमुळे चर्चेत आला आहे. एका वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या तरुणीने त्याच्याविरोधात लैंगिक अत्याचार, लग्नाचे आश्वासन आणि धमकावल्याचे आरोप केले आहेत. या प्रकरणाची कोलकाता हायकोर्टाने दखल घेतल्यानंतर बंगाल पोलिसांनी पोरेलला अटक केली आहे.

तरुणीच्या तक्रारीनंतर न्यायालयाचा हस्तक्षेप :

अभिषेक पोरेलविरोधात एका तरुणीने गंभीर स्वरूपाची तक्रार दाखल केली होती. संबंधित तरुणी वैद्यकीय शिक्षण घेत असून, पोरेलने तिच्याशी लग्न करण्याचे आश्वासन देत तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप तिने केला आहे. याचबरोबर त्याने कथितरित्या या प्रकाराचा व्हिडीओ तयार करून तिला धमकावण्याचा प्रयत्न केला, तसेच तिचे खासगी फोटो सार्वजनिक करण्याची भीती दाखवली, असा दावा तक्रारीत करण्यात आला आहे. या प्रकरणात पोरेलसोबत आणखी एका आरोपीवरही कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आले होते.

या प्रकरणाची गंभीरता लक्षात घेऊन कोलकाता हायकोर्टाने 14 जुलै 2026 रोजी पोरेलला अटक करण्याचे आदेश दिले होते. तसेच त्याच्याकडे असल्याचे सांगितल्या जाणाऱ्या पेन ड्राईव्हचा ताबा घेण्याचे निर्देशही पोलिसांना देण्यात आले होते. त्यानंतर बंगाल पोलिसांनी कारवाई करत हुगळी येथून अभिषेक पोरेलला अटक केली. न्यायालयात पोलिसांनी पेन ड्राईव्ह जप्त केल्याची माहिती दिली असून, तो फॉरेन्सिक तपासणीसाठी पाठवण्यात आल्याचेही सांगितले. संबंधित महिलेने पोरेलवर तिला ओलीस ठेवल्याचाही आरोप केला आहे.

Abhishek Porel Arrested | 2023 पासून संबंध; क्रिकेट कारकिर्दीवर परिणामाची शक्यता :

उपलब्ध माहितीनुसार, संबंधित तरुणीची 2023 मध्ये अभिषेक पोरेलसोबत ओळख झाली होती. पुढे दोघांच्या कुटुंबीयांमध्ये लग्नासंदर्भात चर्चा झाल्याचेही सांगण्यात आले आहे. मात्र नंतर पोरेलने लग्न करण्यास नकार दिल्याचा आरोप तरुणीने केला.

याशिवाय 2 एप्रिल 2026 रोजी दिल्लीत तिच्यावर हल्ला केल्याचाही आरोप करण्यात आला आहे. या सर्व आरोपांची अद्याप न्यायालयीन पातळीवर पुष्टी झालेली नाही. दुसरीकडे, पोलिसांनी वेळेत कारवाई केली नसल्याचा आरोपही या तरुणीने केला असून, त्यामुळेच तिला कोलकाता हायकोर्टात दाद मागावी लागल्याचे तिने म्हटले आहे. अभिषेक पोरेलने यापूर्वी त्याच्यावरील आरोप फेटाळून लावले होते.

News title : Abhishek Porel Arrested After Court Order

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now